जत | नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे 2 हजार अनुदान खात्यावर वर्ग ; दिनकर पंतगे यांची माहिती

0

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी रुपये 2(दोन हजार)  मदत जाहीर केली आहे.हे पैसे बांधकाम कामगारांनी कोणत्या दलाल किंव्हा मध्यस्थींना न देता शासनाने थेट कर्मचाऱ्यांनी नोंदणी केलेल्या बँक खात्यातच पैसे टाकले आहेत,अशी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) सोलापूर व प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे जत जिल्हा सांगली यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिध्दीस दिले आहेत.

कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन झाल्या पासून आज पर्यंत सर्व बांधकाम बंद आहेत बांधकाम कामगारांना काम नाही. त्याची उपासमार होऊ नये म्हणून महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी रुपये 2 (दोन हजार) आपत्कालीन मदत म्हणुन त्याच्या बँक खात्यात जमा केले आहेत. सदर पैसे कामगारांना मिळण्यास कुठलेही अडचण येणार नाही किव्हा कुठलेही कागदपत्राची गरज लागणार नाही.यासाठी कोणत्याही एजंटची ही गरज नाही,अशी सोलापूर सहायक कामगार आयुक्त यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.म्हणून बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेल्या बँकेत जाऊन पैसे काढून घ्यावेत,असे आवाहन कारमपुरी (महाराज) पतंगे यांनी केले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.