जत,प्रतिनिधी : खलाटी ता.जत ग्रामपंचायतीच्या वतीने 14 वित्त आयोगातील मागासवर्गीय निधीतून मागासवर्गीय समाजासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या 50 किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच संतोष नाईक,उपसरपंच मुकेश बनसोडे,ग्रामपंचायत सदस्य तुकाराम देवकते,माजी उपसरपंच अशोक जाधव,मल्हारी बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कोळी, वन कमिटी अध्यक्ष नागेश बनसोडे,डॉ.मीरासाहेब बनसोडे, शिवाजी बनसोडे,आकाश बनसोडे,कोंडीबा बनसोडे, विलास बनसोड,खंडेराव बनसोडे,श्रीदास बनसोडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
खलाटी ता.जत येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करताना संरपच संतोष नाईक,नरेंद्र कोळी आदी