सोनलगी,वार्ताहर : कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन सोनलगी (ता. जत) येथे सरपंच राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सोनलगी ग्रामपंचायतीने सतर्कतेची पावले उचललेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे.गावातील गर्दीच्या ठिकाणी तसेच ग्रामपंचायत परिसर, प्रमुख मंदिर परिसर, चौक, विविध प्रमुख रस्ते आदी ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे,मुंबई येथून व बाहेरून आलेल्या लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावे व बाहेर फिरू नये असे आव्हान केले आहे. यावेळी ग्राम दक्षता समिती अध्यक्ष महादेव कोळी,सदस्य रविंद्र थोरात,अंबाण्णा पुजारी,ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी निर्जंतुकीकरण फवारणीच्या कामामध्ये सहभाग घेतला.
सोनलगीत औषध फवारणी करण्यात आली.