Untitled Post

0

जतेत चार गावठी दारू अड्डे उध्दवस्त

जत पोलीसांची कारवाई ; 22 हाजाराचा मुद्देमाल जप्त

जत,प्रतिनिधी : संचार बंदी असतानाही दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर जत पोलीसांनी छापा टाकला.सातारा रोडवरील पांरडी ताड्यातील छापात  वेगवेगळ्या चार कारवायात एका मोटारसायकलीसह 21,800 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी,

Rate Card

संचार बंदी काळात सर्वत्र लॉकडाऊन आहे.तरीही जत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या पारधी ताड्यावर गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक राजाराम शेळके यांच्या पथकाला मिळाली होती.त्या आधारे मंगळवारी मध्यरात्री या अड्ड्यावर छापा टाकला.त्यात अबिंका अर्जून काळे(वय 45) हिच्या अड्ड्यावर गावठी दारूसह 850 रूपयाचा मुद्देमाल,सुभाष शंकर काळे यांच्याकडून 1400 रूपयाचा मुद्देमाल,संगिता शंकर काळे हिच्याकडून 2350 रूपयाचा मुद्देमाल,किशोर गोपाळ काळे,सुरज गोपाळ काळे(सर्व जण रा.पांरडी ताडा,सातारा रोड,जत)यांच्याकडून एक दुचाकीसह 17,200 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.बेकायदा दारू विक्री,संचारबंदी आदेश तोडणे आदी कलमाखाली या चोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.