जिल्हास्तरीय क्रिडा,सांस्कृतिक स्पर्धेत जतच्या खेळाडूंचे वर्चस्व

0
Rate Card

  

सोन्याळ,वार्ताहर : मागील दोन- तीन वर्षांपासून उत्साहात सुरू असलेल्या यावर्षीच्या सांगली जिल्हा कर्मचारी,अधिकारी व पदाधिकारी क्रीडा नुकतेच क्रीडा संकुल सांगली येथे  मोठ्या उत्साहात आणि चुरशीने पार पडल्या. सर्व प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धेत  आणि सांस्कृतिक कार्यक्रमात जत पंचायत समितीच्या शिक्षक-कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवले. सहभागी आणि विजेत्या खेळाडूंचे जत तालुक्यातुन अभिनंदन केले जात आहे.यावेळी वर्षभर फायलीमध्ये दडलेली डोकी स्पर्धेच्या मैदानावर आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा जोरदार कौशल्य दाखवताना दिसली.सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे,जि प उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे,जिल्हाधिकारी अभिजित चौधरी,जिल्हापोलीस अधीक्षक सुहेल शर्मा,जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.या तीन दिवसांच्या काळात जत पंचायत समितीने यावर्षी चांगली कामगिरी करत पदकांची लूट केली. खो-खो पुरुष बाळासाहेब जायभाये यांच्या नेतृत्वात विजेतेपद, व्हॉलीबॉल पासिंग बेले केंद्रप्रमुख यांच्या नेतृत्वात विजेतेपद, कबड्डी दिलीप पवार यांच्या नेतृत्वात उपविजेतेपद, रस्सीखेच संजय कोकरे यांच्या नेतृत्वात उपविजेतेपद, वैयक्तीक क्रीडा प्रकारात गोळफेक पुरुष सुरेश राख- दुसरा,थाळीफेक रवींद्र वारद तिसरा, भालाफेक रेवणनाथ यादव तिसरा तर महिलामधून 400 मी व 200 मी धावणे प्रकारात वैशाली शिंदे हिने अनुक्रमे तिसरा व दुसरा क्रमांक मिळवला.3 किमी चालणे प्रकारात माशाबी चांदसो देसाई यांनी दुसरा क्रमांक मिळवला. दुसऱ्या दिवशी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सर्व कर्मचारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मनमुराद आनंद लुटत आपली कला सादर केली.जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सुरेल आवाजात ‘गाता रहे मेरा दिल’..

हे सदाबहार हिंदी गीत तर जतचे जि.प.सदस्य सरदार पाटील यांनी धरिला पंढरीचा चोर.. हे गीत सादर केले. मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी जत पंचायत समितीने भावे नाट्यगृहाचा सभागृह दणाणून सोडला. नुकताच प्रदर्शित झालेल्या तानाजी द अनसंग वारीयर मधील शंकरा रे शंकरा…या गाण्यावर रोमांच आणणारे नृत्य ज्ञानेश्वर पांपटवार, संदीप कांबळे यांच्या ग्रुपने सादर केले. या स्पर्धेसाठी जि.प.सदस्य सरदार पाटील व उपसभापती विष्णू चव्हाण यांनी तीनही दिवस प्रत्यक्ष हजर राहून खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. संजय कोकरे कनिष्ठ लेखाधिकारी, लखन होनमोरे, एम बी चव्हाण, आर आर सावंत, संभाजी कोडग, विषयतज्ञ सुरेंद्र सरनाईक, लिपिक संतोष गुरुड,दिलीप पवार  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अगदी खेळीमेळीच्या निकोप वातावरणात स्पर्धा पार पडल्या.विजयी झालेल्या सर्व खेळाडूंचे जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी अभिनंदन केले.

सांगली : खोखो आणि पासिंग हॉलीबॉल मध्ये अंतिम सामन्यात विजयी झाल्यानंतर जतच्या संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्यासमवेत विजयी जल्लोष केला.

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.