जत नगरपरिषेदच्या विषय समित्या बिनविरोध

वनिता साळे,अश्विनी माळी,संतोष कोळी,संतोष कांबळे सभापती
जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषेदत अखेर कॉग्रेस-राष्ट्रवादी युती अभेद्य राहिली.शुक्रवारी झालेल्या विषय समितीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.यात कॉग्रेस व राष्ट्रवादीकडे तीन तीन समित्या जबाबदारी देण्यात आली आहे. वनिता साळे,अश्विनी चंद्रकांत माळी,बाळाबाई पांडुरंग मळगे,संतोष कृष्णा कोळी,संतोष उर्फे भूपेंद्र कुमार कांबळे,आप्पासो दुर्गाप्पा पवार यांची सभापती पदी वर्णी लागली आहे. जत नगरपरिषदेत सध्या कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. मात्र काही दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी एका खाजगी कार्यक्रमात यापुढे भाकरी बदलविण्याचे संकेत दिले होते.त्यामुळे जत नगरपरिषेदेत सत्ता बदल होण्याची चर्चा होती.राष्ट्रवादी व भाजपा एकत्र येईल अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या मात्र शुक्रवारी सकाळी पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी तुषार ठोंबरे व मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी निवड प्रक्रिया सुरू केली.कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अर्ज दाखल केले.विरोधी भाजपा सदस्यांनी सभापती निवडीकडे पाठ फिरविली.त्यामुळे ठोंबरे यांनी बिनविरोध निवड घोषित केली.समित्या व सभापती असे पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती वनिता साळे,महिला व बालकल्याण समिती अश्विनी माळी,स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती बाळाबाई मळगे,सार्वजनिक बांधकाम समिती संतोष कृष्णा कोळी,नियोजन व विकास समिती आप्पासो पवार,शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक समिती संतोष कांबळे.दरम्यान जत नगरपरिषदेतील सत्तेत जाण्याचे भाजपचे स्वप्न फसले आहे.त्यांनी सभापती निवड प्रक्रियेकडे पाठ फिरवली.दरम्यान या निवडीनंतर नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनवर,जेष्ठ नगरसेवक इकबाल गंवडी,नाना शिंदे,स्वप्निल शिंदे,अशोक बन्नेनवर व कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. जत नगरपरिषदेच्या विषय समितीच्या नवनिर्वाचित सभापतीचा सत्कार करण्यात आला.
जत नगरपरिषेदेच्या विषय समितीच्या नवनिर्वाचित सभापतीचे सत्कार करण्यात आले.