आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव
जत,प्रतिनिधी : जतचे कर्तबगार,युवकांचे ऑयडॉल आमदार विक्रमसिंह सावंत यांचा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा झाला.राज्यासह जिल्हा,तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय,प्रशासना मधील दिग्गजांकडून तसेच तालुक्यातील जनतेकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.जत बाजार समिती आवारातील डांळीब हॉलमध्ये बुधवारी आमदार सांवत यांनी शुभेच्छा स्विकारल्या.मागील दोन तपाहून अधिक काळ अनेक सेवाभावी उपक्रमातून आमदार सांवत यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात प्रवेश केला.शहराबरोबर त्यांनी तालुक्यात,जनतेसाठी विविध उपक्रम राबवले.युवकांची ताकद समाजाच्या विकासात आणली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सांवत ग्रुपचे किंबहुना कॉग्रेसचे सर्वात मोठं संघटन तयार केलं.त्यांची परिचिती वाढदिनी आली.बुधवारच्या पुर्ण दिवस रात्री उशिरापर्यत विविध स्तरातील नागरिकांची उपस्थितीवरून आली.आमदार सांवत नावचं ऑयडॉल नेतृत्व आता सर्वमान्य झालं आहे.कॉगेसचे प्रदेशाध्यक्ष,तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम,खासदार संजयकाका पाटील,आमदार अनिल बाबर,मानसिंग नाईक,सुधिर गाडगीळ,सुमनताई पाटील,बाबा शिंदे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील,उपसभापती तानाजी पाटील,माजी सभापती बाबासाहेब कोडग,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग,कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,भुपेंद्र कांबळे,चंद्रसेन सांवत, मुना पखाली,सलीम पाच्छापुरे,निवृत्ती शिंदे,युवराज निकम,निलेश बामणे,दिलीप सोलापुरे,सुभाषराव गायकवाड,बाळासाहेब चव्हाण,नाथा पाटील,रामचंद्र पाटील, सोमनिंग चौधरी,यल्लप्पा तोडकर,महेश चव्हाण,महादेव सांळुखे,अतुल मोरे,वंसतराव चव्हाण,संभाजी कदम सर,राजू चव्हाण, चंद्रकात चव्हाण, महादेव अथणीकर, के.डी.मुल्ला,सलिमा मुल्ला,सुरेश कुळोळ्ळी,लक्ष्मण छत्री सावकार,दिपक लंगोटे,गुंडा माने,दिनेश सोळगे,गणी मुल्ला,बाळासो पवार,आण्णासाहेब गायकवाड,दिपक अंकलगी,डॉ.प्रदिप कोडग,संतोष पाटील,मनोहर भोसले, राजू भोसले,अनिल कोटी,राजकुमार हविनाळ,आप्पासाब मुल्ला,समाधान काशिद,आण्णासाहेब बाबर,सौदागर माने,कुंदन बोरगे,आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.आमदार सांवत यांनी सकाळी झालेल्या कार्यक्रमा नंतर दिवसभर सर्व स्तरातील मान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारल्या.दिवसभरात सुमारे दहा हजार जणांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.आवाहन केल्यानुसार हार,तुरे,गुच्छ ऐवजी दहा हजार वह्याची भेट वाढदिनी संकलित झाल्या.दरम्यान वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 102 जणांनी रक्तदान केले.वाढदिवसानिमित्त विक्रम फांऊडेशनच्या वतीने एसटी स्टँडमध्ये प्रवाशाना पाण्याच्या सोयीसाठी कुपनलिका खोदून देण्यात आली.अशा पध्दतीने तालुकाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले.’वाढदिवसानिमित्त मला प्रेमपूर्वक शुभेच्छा देणाऱ्यांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करत. प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानणे शक्य नाही; पण तुम्ही प्रत्येक जण माझ्या हृदयात आहात.तालुक्यातील माझी ही जनता सुखा,समाधानाने राहण्यासाठी आमदारकी पणाला लावून विकास कामे करीन,सर्वाचे अनेक अनेक धन्यवाद,’ असे भावनिक आभार आमदार सांवत यांनी मानले.

जत कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी वाढदिनी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.