जत,प्रतिनिधी : जत वनविभागाच्या वतीने वनवणवा सप्ताहाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम व जनजागृत्ती फेरी काढण्यात आली.शहरातील द फेडस् हायस्कूल एसआरव्हीएम,के.एम.हायस्कूलच्या 600 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला शहरातील प्रमुख चौकातून घोषणा देत फेरी काढण्यात आली.त्याशिवाय विशेष कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी वन क्षेत्रपाल महादेव मोहिते,परिमंडळ अधिकारी एस.के.गुगवाड शकील मुजावर,गणेश दुधाळ सर्व शाळाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
वन शिक्षेत्रपाल मोहिते म्हणाले, मार्च- एप्रील महिन्यापासून जंगलांना आगी
लागल्या तर त्याचे वाईट परिणात होतात. वन वन्य जीवांची प्रचंड हानी होते. पानझरीच्या वनव्यांना विविध कारणांनी आगी लागतात.जंगलाना लागणाऱ्या आगीमुळे प्राण्यासह,मानवी जीवनावरही यांचा परिणात होतो. हे लक्षात घेउन जंगलांना लागणा आगीवर
नियंत्रण करण्यासाठी वनविभागाला सहकार्य करा,अवैध जंगल तोड थांबविण्यास अधिक लक्ष द्यावे,वनविभाग बरोबर गावकऱ्यांनी देखील पुढाकार घेऊन वनसंवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी जंगल वाचवा, जीवन वाचवा असे सांगितले.
जत : वनवनवा सताह अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलताना वन क्षेत्रपाल महादेव मोहिते,बाजूस मान्यवर,वनवा रोका जंगल वाचवा अतर्गंत जागृत्तीफेरी काढण्यात आली.