संखातील जुन्या स्टँडजवळचे अतिक्रमण काढणार | रिपाइच्या आदोंलनाला यश : ग्रामपंचायतीचे लेखी पत्र

0
Rate Card

संख,वार्ताहर : संख ता.जत येथील जुन्या बसस्थानका नजिकचे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी यासाठी रिपाइचे जिल्हा नेते बाबासाहेब कांबळे,नगरसेवक भुपेंद्र कांबळे,श्रीकांत हुवाळे,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राकेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपाइच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले.

विस्तार अधिकारी मनोज जाधव,संरपच मंगल पाटील यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन सायकांळी मागे घेण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,संखचे जुने बसस्थानक परिसरात पुर्वी बसेसच्या फेऱ्या होत होत्या,मात्र गेल्या काही दिवसापासून बसस्थानका भोवती अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.त्यामुळे येथे बसेस येत नाही.यासंदर्भात ग्रामसभेत ठरावही घेण्यात आला आहे.ग्रामपंचायतीने नियमानुसार अतिक्रमण काढण्याची गरज आहे.असे निवेदनात म्हटले होते.दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने आंदोलकांना संरपच मंगल पाटील, उपसंरपच सदाशिव दर्गाकर,ग्रामसेवक नरळे यांनी लेखी आश्वासन दिले आहे.त्यात  म्हटले आहे की,ग्रामपंचायतीचा मुंबई अधिनियम सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केलेबाबत कलम 53 अतर्गंत कारवाई करून लवकरात लवकर अतिक्रमण काढून बसस्टँड खुले करण्यात येईल असे लेखी दिले.यावेळी छत्रसेन कनमडी,अरुणकुमार हिंदुस्थानी,संजय कांबळे उपस्थित होते.

संख ता.जत येथील जुन्या बसस्थानक शेजारी अतिक्रमणे काढावे म्हणून रिपाइच्या वतीने उपोषण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.