सहकार काळजीपुर्वक चालला पाहिजे ; आ.विक्रमसिंह सांवत | एंकूडी सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन
जत,प्रतिनिधी :सरकार बदलत राहील. राजकारण चालेल. पण सहकार काळजीपूर्वक चालला पाहिजे. सहकारात घेण्यासाठी नाही, तर देण्यासाठी येतो हे ध्यानात ठेवून काम करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.एकूंडी ता.जत सर्व सेवा सह.सोसासटी लि.एंकूडीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या हस्ते झाले.यावेळी बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, पंचा़यत समिती सदस्य रामाण्णा जिव्वणावर, दिग्विजय चव्हाण, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,कार्याध्यक्ष नाना शिंदे,जिल्हा बँक विभागीय अधिकारी प्रभाकर उर्फ राजू कोळी,साहय्यक निंबधक बिपीन मोहिते,चेअरमन श्रींमत गुड्डोडगी,व्हा.चेअरमन मलाप्पा हेळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार सांवत पुढे म्हणाले,विकास सोसायटी ह्या शेतकऱ्यासह जिल्हा बँकाचा आर्थिक कणा आहेत.सोसायट्यांनी केवळ कर्जपुरवठा यापुरते मर्यादित न राहता अन्य व्यवसाय, उद्योगही करणे काळाची गरज बनली आहे.एंकुडी सोसायटीची कारभार चांगला आहे.अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती या माध्यमातून उंचावली आहे.तो चढता आलेख कायम ठेवावा असे शेवटी आ.सांवत म्हणाले.
ग्रा.प.सदस्य श्रीशैल पाटील,माजी चेअरमन बसवराज घेज्जी,सरपंच दीपक लंगोटे,माजी सरपंच लक्ष्मण मगसुळी, माजी.माजी चेअरमन महेश पाटील,सचिव सुरेश पुजारी,चौगुले,विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम,युवा नेते अतुल मोरे,माजी सरपंच बसगोंडा नाईक,निळकंठ नाईक,भारत गायकवाड,रावसाहेब मगसुळी,सचिन कुलकर्णी,मोठ्या ग्रामस्त, पदाधिकारी उपस्थित होते.
एंकूडी ता.जत येथील सर्व सेवा सोसायटीच्या कार्यालयाचे लोकार्पण करताना आमदार विक्रमसिंह सांवत,रामाण्णा जिव्वणावर,अभिजित चव्हाण