तुकाराम महाराजाचा अपघातातील जखमींना वाचविण्याचा प्रयत्न | वेळेत उपचार न मिळाल्याने एका तरूणाचा मुत्यू
डफळापूर, वार्ताहर : जत-सांगली मार्गावरील नांगोळे फाटा येथे झालेल्या दुचाकी अपघातातील तरूण बाळू उर्फ रामदास गुंडा गडदे वय 30,राजाराम सुभाषराव मासाळ दोघे रा.बाज व अन्य एकास आपल्या गाडीत घालून उपचारार्थ कवटेमहांळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करत त्याचा प्राण वाचविण्याचा प्रयत्न करत माणूसकी जपण्याचे काम हभप तुकाराम महाराज यांनी केले.मात्र गंभीर जखमी बाळू गडदे यांचा वेळेत उपचार न मिळाल्याने दुदैव्याने मुत्यू झाला.

कवटेमहांकाळ तालुक्यातील नागोळे फाटा येथे दुचाकीचा अपघात झाला होता.त्यातील एका तरूणांस गंभीर दुखापत झाली होती.येथे जमलेल्या काही नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेलाही फोन सावला मात्र तब्बल तासभर होऊन रुग्णवाहिका आली नाही.जवळपास 60-70 खाजगी वाहनांनाही हात करून थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र एकही वाहन थांबले नाही.याच मार्गावरून गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती हभप तुकाराम महाराज हे या मार्गावरून जात होते.त्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी तात्काळ त्या जखमी तरूणांला आपल्या गाडीत घातले.कवटेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र 108 रुग्णवाहिका व बघ्याची भूमिका घेणाऱ्या नागरिकांच्यात माणूसकी हरविल्याबाबत त्यांनी तीव्र शंब्दात रूग्णालय प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली.