जत पोलीस ठाण्याचा वसुली कलेक्टर सुसाट I मोठ्या रक्कमा घेऊन तडजोडी,अधिकाऱ्यांचा पाठिंबा की हिस्सेदारी ?

0
0

जत,प्रतिनिधी : जत पोलीस ठाण्यातील वसूली कलेक्टर कडून फिर्यादी,संशयित आरोपींना कायद्याची भिती दाखवत लुट केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे.

वाढलेल्या हप्तेबाजीमुळे सर्व बेकायदा धंदे सुरू होतानाचे चित्र आहे.तर दुसरीकडे ठाण्यात ठिय्या मांडून असलेल्या वसूली कलेक्टर कडे अनेक केसेस संदर्भातील तडजोडी वर्ग करून दररोज लाखो रूपये बेधडक लुटले जात असल्याचीही चर्चा आहे.साहेबाची खास मर्जी असलेल्या या वसुली कलेक्टर मग तडजोडीच्या रक्कमा ठरवितो.विविध कलमाची भिती दाखवून मोठे आकडे ठरविले जातात.किरकोळ गुन्ह्यातही पंधरा हजारा पासून लाखापर्यत तडजोड केली जात असल्याचीही चर्चा आहे.

तडजोडीचे पैसे साहेबांना द्यावे लागतात म्हणून थेट पोलीस ठाण्यातच स्विकारले जात असल्याची चर्चा आहे.दरम्यान मोठ्या रक्कमा घेऊन तडजोडीत अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे,की हिस्सेदारी ?असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.

फिर्यादी, संशयित आरोपींना अधिकाऱ्यांकडून दमबाजी,कलेक्टर कडून तडजोडी

जत पोलीस ठाण्यात येणाऱ्या फिर्यादी दाखल झाल्यानंतर संबधित तक्रारीवर एकाद्या संबधित पोलीस पाटील,लोकप्रतिनिधी,अथवा नेत्यांने खरी परिस्थिती संबधित अधिकाऱ्यांला सांगण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अधिकाऱ्यांकडून थेट दमबाजी केली जात,केबिनमधून हाकलून देण्यापर्यत या अधिकाऱ्याची मजल गेली आहे.पदाधिकाऱ्यांनाही थेट दमबाजी करण्यात आल्याचे तक्रारी आहेत. आरडाओरडा करून भिती घातली जाते.एवढ्यानंतर मग काम चालू होते वसुली कलेक्टरचे काम त्याच्याकडे हा प्रकार गेल्यानंतर मग साहेब ऐकत नाही.म्हणून मोठ्या रक्कमेची मागणी केली जाते.साहेबांना सांगतो,मिटवतो म्हणून मोठ्या लाचेची रक्कम थेट ठाण्यात स्विकारली जात असल्याची जोरदार चर्चा आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here