जतेत ‘नागरिकत्व’विरोधात संविधान बचाव फेरी

0

जत,प्रतिनिधी : केंद्र शासनाकडून पारित करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने पुकारलेल्या फेरीत बहुजन समाजासह असंख्य मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. शहरात संविधान बचाव महाफेरी काढत नागरिकत्व दुरुस्ती कायदा तत्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या फेरीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.यावेळी मुफ्ती युनुस मुल्ला,मौलाना आसिफ,मौलाना अरिफ,मुफ्ती नदाफ,मुफ्ती मुजममील,राजूभाई इनामदार,मकसूद नगारजी,इकबाल गंवडी,श्रीकांत शिंदे,नाना शिंदे,भुपेंद्र कांबळे,अतुल कांबळे,विक्रम ढोणे,मलकारी पवार,अमोल सांबळे,प्रकाश देवकुळे,उत्तम चव्हाण,प्रभाकर सनमडीकर,नियाज जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.केंद्र शासनाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्यासह नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एनआरसी) लागू न करण्याची मागणी होत आहे. याच मागणीसाठी जत येथील शाही मस्जिद येथून फेरी काढण्यात आली. हनुमान मंदिर,महाराणा प्रताप चौक,आरळी कॉर्नर,छत्रपती संभाजी राजे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयात अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर या मोर्चाचा समारोप झाला. दरम्यान, समारोपादरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा, अशी मागणी करीत अनेकांनी मनोगत व्यक्त केले; तसेच जोपर्यंत हा कायदा रद्द करणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन केले जाईल, असा निर्धार यावेळी करण्यात आला. फेरीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची संयोजकांनी विशेष काळजी घेतली.मोर्चाला बहुजन क्रांती मोर्चा,शिवसेना,आरपीआय,दलित महासंघ,डीपीआय,राष्ट्रवादी,कॉंग्रेस पार्टीकडून पांठिबा देण्यात आला.

Rate Card

सीएए आणि एनआरसी हे दोन्ही कायदे केवळ मुस्लीम विरोधी नसून ते एकूणच दलित, ओबीसी, भटके विमुक्ती, आदिवासींसह या देशातील गरीब लोकांविरुद्धचे षड्यंत्र आहे. तेव्हा या कायद्याला प्रखरतेने विरोध करण्याची गरज आहे. व यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली आहे. धर्म सकंटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू, मात्र संविधान संकटात आहे. सीबीआय, सर्वोच्च न्यायालय या संस्था संकटात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लोकशाही संपावायची आहे, म्हणून हे सगळं सुरु असल्याची मते यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

जत येथे ‘नागरिकत्व’विरोधात संविधान बचाव मोर्चात सामिल झालेले नागरिक

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.