2 लाखाचे व्याजासह 18 लाख मागणाऱ्या तिघा खाजगी सावकारावर गुन्हा दाखल

0
Rate Card

जत,प्रतिनिधी :  दोन लाखाचे आठरा लाख व्याजासह पैसे मागणाऱ्या मागणाऱ्या खाजगी सावकार अभय सदाशिव कोळी,अमोल सदाशिव कोळी,अमोल सदाशिव कोळी (सर्वजण रा.जत) यांच्याविरोधात खाजगी सावकारी व खंडणीचा गुन्हा जत पोलीसांनी दाखल केला आहे.याप्रकरणी महेश भाऊसाहेब पवार रा.अमृत्तवाडी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, महेश पवार यांनी संशयित कोळी बंन्धू कडून दोन वर्षापुर्वी 2 लाख रूपये 3 टक्के व्याजाने घेतले होते.महेश पवार यांनी महिन्याचे व्याज देत असताना कोळी बंन्धू यांनी त्यांना सहा महिन्यानंतर व्याज व मुद्दल एकाच वेळी द्या असे सांगितले होते.सहा महिन्यानंतर महेश पवार यांनी व्याजासह होणाऱ्या दोन लाख 36 हजार रूपयापैंकी एक लाख रूपये अभय कोळी यांच्या बँक खात्यावर भरले होते.तर बाकीचे पैसे घरी नेहून देत असताना अभय कोळी,अमोल कोळी,अविनाश कोळी यांनी तुझे व्याजासह दहा लाख रूपये झाले आहेत.तेवढे पैसे दे म्हणून दमदाटी केली.जमीन नावावर कर म्हणून गाडीत घालून कवटेमहांळ येथे नेहले मात्र पवार यांनी त्यांच्यापासून सुटका करून घेतली होती.टँक्टरही ओढून नेहण्याचा प्रयत्न केला होता.सर्व पैसे देऊनही ते वारवांर जादा पैशाची मागणी करत होते.पवार यांच्या अमृत्तवाडी येथील घरात जाऊन कुंटुबातील इतर सदस्यांना शिवीगाळ, दमदाटी करत होते.व्याजासह त्यांनी 18 लाखाची मागणी केली होती.पैसे न दिल्याच तुला सोडणार नाही असे धमकावले होते. सततच्या दमदाटीला कटाळूंन महेश पवार यांनी पोलीसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास हवलदार हाक्के करत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.