जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील म्हैसाळ योजना,तालुका विभाजन,पुर्व भागातील 42 गावांना पाणी देण्यास शासन असमर्थ ठरले आहे.याशिवाय जत तालुक्यातील अनेक प्रश्न गंभीर आहे.शासनाने तातडीने यांची दखल घ्यावी या मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.प्रांताधिकारी प्रंशात आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सांयकाळी उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणास माजी जि.प.उपाध्यक्ष बसवराज पाटील,माजी सभापती मन्सूर खतीब, डॉ.रविंद्र आरळी, हभप तुकाराम महाराज,शिवाजी ताड,ए.के.पुजारी,सिध्दू शिरसाड,सोमनिंग बोरामणी,स्वप्निल शिंदे,संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, चंद्रकांत गुड्डोडगी,आप्पा पवार,रमेश सांबळे,रामगोंडा जिवाण्णावर, डॉ.देवयानी गावडे,साहेबराव गावडे,शिवाप्पा तांवशी,दत्ता चव्हाण, अँड.श्रीपाद अष्टेकर,गुरूनाथ बिजरग्गी, मच्छिद्र वाघमोडे,रमेश माळी,मोहन भोसले,नारायण कामत,नागनगोडा पाटील,पांडुरग बामणे,पिराप्पा माळी,रेवाप्पा पट्टनशेट्टी,शंकर गायकवाड,बाबासाहेब पाटील,गंगाधर हारूगेरी,बाजी केंगार,रविंद्र मानवर,शिवाजी शिंदे,एन.डी.शिंदे, आदी सुमारे तीनशे पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देत पांठिबा दिला.
जमदाडे म्हणाले, जत तालुक्यातील सिंचन योजना,तालुका विभाजन, रस्ते,सह विविध समस्यासाठी मी पाठपुरावा करत आहे.शासनाला वारवांर निवेदने दिली आहे.शासनाने तालुक्यासाठी स्वतंत्र निधी देऊन कायमस्वरूपी समस्या सोडवाव्यात याकडे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून हे उपोषण करण्यात आले आहे.
बसराज पाटील म्हणाले,जत पुर्व भागातील 42 गावासांठी सिंचन योजनेचा प्रश्न मोठा आहे.सातत्याने पाणी टंचाईची झळ आम्हाला सोसावा लागत आहे. संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले मात्र येथे सर्व विभाग सुरू नसल्याने अडचणीचे परत आहे.आमचा विकास करायचाच असेलतर तालुक्याचे त्रिभाजन करून सर्व ठिकाणी शासकीय यंत्रणा कार्यान्वित करावी.
मन्सूर खतीब म्हणाले,तालुक्यातील रस्ते,पाणी टंचाई महत्वाचे प्रश्न गंभीर आहे.नगरपालिका, ग्रामपंचायती सक्षम नसल्याने गावगाड्याचे प्रश्न आवासून उभे आहेत.त्याकडे शासनाने लक्ष द्यावे.
डॉ.रविंद्र आरळी म्हणाले,जत शहरासह तालुक्यातील प्रश्नासाठी आमचा लढा सुरू आहे.जमदाडे साहेब यांनी केलेले उपोषण हे शासनाला इशारा समजावा,विकाससाठी लढण्यासाठी सर्व तयारी आहे.
या आहेत मागण्या
म्हैशाळ योजना जत भाग त्वरीत चालु करावी व म्हैशाळच्या सर्व चालू कामाना गती देवून शेतकऱ्याच्या बांधापर्यत पाणी द्यावे.तालुक्याचे त्रिभाजन करावे किंवा माडग्याळ व उमदी येथे अप्पर तहसिल मंजूर करून स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावे. संख अप्पर तहसिलला जोडलेली गैरसोयीची 13 गावे पूर्वी प्रमाणेच जत तहसिलला जोडावीत.संख महावितरण उपविभागाला गैरसोयीचे जोडलेली 11 गावे जत महावितरण उपविभागालाजोडावीत.2018 मधिल नुकसान झालेल्या 67 रब्बी गावातील पिकांची नुकसान भरपाई दयावी.अवर्षण तालुका म्हणून जत येथे कृषी महाविद्यालय व माडग्याळ येथे नविन आय.टी.आय कॉलेजला मंजूरी द्यावी.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सन 2015-16 मध्ये पूर्ण केलेल्या वैयक्तीक लाभाच्या योजना (विहीर, शेततळे, व गाय/शेळी गोठा) यांची बीले त्वरीत द्यावीत.वाळंखिडी, नवाळवाडी व बेवनूर या गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्ज माफीचा लाभ द्यावा.अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायतीसाठी 25 हजार बागायती क्षेत्रासाठी एक लाख प्रती हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी.25/15 योजनेतून व तीर्थक्षेत्र विकास योजनेतून 2019-20 मध्ये मंजूर झालेल्या कामावरील स्थगिती उठवावी.खासबाब म्हणून द्राक्षासाठी बिळूर व डाळीबासाठी माडग्याळ येथे कल्सटर निर्माण करावे.आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
जत : माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले.