अंकले खून प्रकरणातील प्रियकरावर गुन्हा दाखल

जत,प्रतिनिधी : अंकले ता.जत येथील मयत जागृत्ती बाबासाहेब यमगर (वय-17) हिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी येदू उर्फ आबा शंकर कोळेकर (रा.कोळे,ता.सांगोले) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.मयत जागृत्तीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे.संशयित आबाला सांगली न्यायालयात हजर केले असता 9 जानेवारीपर्यत पोलीस कस्टडी न्यायालयाने सुनावली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, मयत जागृत्ती हिला संशयित आबा याने लग्नाची मागणी घातली होती.मात्र जागृत्तीचे 18 वर्षे वय पुर्ण झाले नव्हते.शिवाय आबा व्यसनी व बेरोजगार असल्याने जागृत्तीच्या आई-वडीलांनी या लग्नास नकार दिला होता. मात्र तरीही आबा व जागृत्ती यांच्या संपर्क होत होता. आबाने जागृत्तीस मोबाइल घेऊन दिला होता.दोघांची शरीरीक जवळीकता वाढली होती.त्यांची माहिती वडीलाला लागली होती.वडीलांनी दोघाही सुनावले होते.तरीही आबा वारवांर घरासमोरून चकरा मारत होता.अल्पवयीन जागृत्तीवर अत्याचार करणे या कलमाखाली आबावर गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास सा.पो.नि. विनोद कांबळे करित आहेत.