मुलीचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण : दिपाली गायकवाड | येळवीतील “मोफत फॅशन डिझाईनिंग”च्या कोर्सचे उद्घाटन

0

येळवी : येळवी ता.जत येथील ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्था येळवी व नेहरू युवा केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने “मोफत फॅशन डिझाईनिंग”च्या कोर्सचे उद्घाटन  सा.पोलीस निरिक्षक सौ.दिपाली गायकवाड यांच्याहस्ते पार पडले.

Rate Card

यावेळी विक्रम फौंडेशनच्या मीनल सावंत,ज्येष्ठ नागरिक पंचाक्षरी अंकलगी, महिला संरक्षण अधिकारी एस.एस.केदार,उपसरपंच सुनिल अंकलगी,नेहरू युवा केंद्र सांगलीचे लेखालिपिक संजय कुरणे (सर),सागर व्हनमाने,सां.जि.म.सह.बँक.सांगलीचे जत तालुका अधिकारी प्रभाकर कोळी, मारूती मदने,संस्थेच्या सदस्या आरती अंकलगी, ग्रा.पं.सदस्या निलाबाई कदम, सविता सुतार,कोंडाबाई कुलाळ,गंगुबाई सुर्वे, कोर्स प्रशिक्षक प्राजक्ता माळी,सुचिता शिंदे,विद्या फडतरे,संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी,ग्रा.पं.सदस्य तथा सचिव संतोष पाटील तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,महिला प्रशिक्षणार्थी गावातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होत्या.

ग्रामीण भागातील महिला सक्षम व्हाव्यात,महिलांच्या हाताला काम मिळावे, महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या प्रशिक्षणाची सोय येळवी येथे करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना सा.पो.नि गायकवाड म्हणाल्या,ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण,महिलांची कुचंबणा, घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलले जाते. त्यांच्यावरील अन्याय कमी होत नाही. यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.महिलांवर होणारे अन्याय महिलांनीच सक्षमरीत्या सामना करून सोडविले पाहिजेत. त्याशिवाय महिलांची प्रगती अशक्य आहे आणि ही शक्ती महिलांमध्ये फक्त शिक्षणामुळेच येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्रोत आहे. शिक्षण घेतल्यामुळे आपल्या जीवनाला एक दिशा मिळते, संजीवनी मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राकडे पाहू शकतो.त्यांनी महिलांना आकाशी उडण्याची द्वारे खुली केली.

येळवी ता.जत येथील मोफत फॅशन डिझाईनिंग”च्या कोर्सचे उद्घाटन करताना  सा.पोलीस निरिक्षक सौ.दिपाली गायकवाड व मान्यवर महिला

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.