माडग्याळ,वार्ताहर : जत पंचायत समितीच्या सभापती पदी मनोज जगताप आणि माडग्याळचे सुपुत्र विष्णू चव्हाण यांची उपसभापती निवड झाल्याबद्दल बाजार समिती संचालक विठ्ठल निकम यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन दोघांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सोमाणा हक्के,महादेव सावंत,महादेव माळी सावकार,युवा नेते कामाणा बंडगर,शशिकांत माळी,राजू कांबळे,कामदेव कोळेकर,अशोक माळी , कासू माळी,लक्ष्मण माळी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल निकम म्हणाले,खरोखरचं आज माडग्याळकरांसाठी आंनदाचा दिवस आहे.देशाला स्वांतत्र मिळाल्यापासून प्रथमच माडग्याळ मधील विष्णु चव्हाण यांच्या रूपाने गावातील नेतृत्वाला तालुक्यातील चांगल्या पदावर काम करण़्याची संधी मिळाली आहे. सामान्य कुटुंबातील एक अल्पसंख्याक अशा एका व्यक्तीला न्याय देण्याचे काम माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले आहे.भविष्यात माडग्याळ मधील विकासाचा अनुषेश भरून काढण्यासाठी चव्हाण सर निश्चित काम करतील.मनोज जगताप म्हणाले,तालुक्याचा सर्वागिंन विकास करण्याचे काम माझे वडील माजी आमदार विलासराव जगताप यांच्यापासून सुरू आहे.त्यात गती आणून ग्रामीण भागातील गावगाडे सक्षम करण्यासाठी आम्ही काम करू.
विष्णू चव्हाण म्हणाले,माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला पंचायत समितीच्या उपसभापती काम करण्याची संधी मिळाली हे.माडग्याळसह तालुक्यातील जनतेच्या हितासाठी काम करू,नेत्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
माडग्याळ ता.जत येथे सभापती मनोज जगताप व उपसभापती विष्णू चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.