डफळापूरातील अतिक्रमण हटविण्यासाठी मोजणी होणार I अनिल कांबळे यांना प्रशासनाचे लेखी आश्वासन

0

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील वार्ड नं.1 मधील अतिक्रमणे काढण्यासाठी तातडीने मोजनी करून अतिक्रमणे सिध्द झाल्यास ग्रामपंचायत कायद्याप्रमाणे अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करावी,असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिल्याने अनिल राजाराम कांबळे यांचे उपोषण मागे घेण्यात आले आहे.डफळापूर गाव भागातील वार्ड क्र.1 मधील नवबौध घटकांच्या वस्त्याचा विकास या योजनेतून पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सिमेंट कॉक्रीट गटार बसविण्याचे काम सुरू आहे.मात्र अनिल कांबळे यांच्या घरानजिक अतिक्रमणे असल्याने तेथे काम करता येत नसल्याने काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कांबळे यांनी अतिक्रमण काढून रस्त्याचे काम करण्यासाठी आंदोलनचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.त्यांनी भूमि अभिलेख  व ग्रामपंचायतीला वार्ड नं.एकमधील मोजणी करावी,त्यात अतिक्रमण आढळल्यास ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील नियम 53 नुसार कारवाई करावी असे लेखी आदेश देत तातडीने कारवाई करण्यात यावेत असे कळविले आहे. त्यामुळे तात्पुर्ते आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.