जत,प्रतिनिधी : म्हैसाळ सिंचन योजनेतून कोळगिरी तलावात पाणी सोडता येते का यासंदर्भात आमदार विक्रमसिंह सांवत यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.त्याशिवाय कँनॉल लगतच्या कोणकोणत्या तलावात पाणी सोडणे शक्य आहे.या संदर्भात माहिती घेण्यात आली.येत्या अवर्तनात जत तालुक्यातील जास्तीत जास्त तलावे,नालाबांध ओढापात्रातील बंधारे भरण्याचे नियोजन करण्यात येत आहे.यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत आग्रही आहेत.त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी म्हैसाळच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,कौरगोंड,माजी सभापती बाबासाहेब कोडग उपस्थित होते.
सांगली येथील म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेताना आमदार विक्रमसिंह सांवत व पदाधिकारी