कल्याण-मुंबई मटका जोमात उमदी परिसर व्यापला :जुगार्‍यांची संख्या वाढली ; स्थानिक पोलीसाचे साटेलोटे

0
4

जत,प्रतिनिधी : उमदी,संखसह ग्रामीण भागामध्ये देशी दारू व हातभट्टी दारू विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येक गावात पानपट्टी, किराणा दुकान तसेच एजंटामार्फत सर्रासपणे देशी दारू विकत मिळते. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्य विक्रेत्यांवर कारवाई करून पोलिसांनी कायमचा अवैद्य देशी दारुचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. पोलिस प्रशासनाला दरमहा मटका, अवैध दारू विक्री व जुगाराच्या केसेस बाबत उद्दिष्ट दिले जाते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलिस प्रशासन अवैध धंदेवाल्यांना केसेस देण्याबाबत सांगतात. त्यानंतर पंटरला उभे करून कागदी केसेस व जप्त माल दाखविण्यात येतो पोलिस प्रशासनाला दरमहा मटका, अवैध दारू विक्री व जुगाराच्या केसेस बाबत उद्दिष्ट दिले जाते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलिस प्रशासन अवैध धंदेवाल्यांना केसेस देण्याबाबत सांगतात. त्यानंतर पंटरला उभे करून कागदी केसेस व जप्त माल दाखविण्यात येतो.जत शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यांचा आपण लवकरच बंदोबस्त करू. शिवाय ऑनलाईन लॉटरी, क्लब व अवैध दारू विक्रीबाबत तातडीने कारवाई करून संपूर्ण तालुका अवैध धंद्यातून मुक्त करण्यासाठी सिंघम फेम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये कल्याण-मुंबई मटका क्लब, अवैध दारू विक्री मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पोलिसांच्या थातूरमातूर कारवाईला अवैध धंदे चालक जुमानत नसल्याचे चित्र जत तालुक्यात पहावयास मिळत आहे. अवैद्य धंद्याचा सर्व कारभार राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या अवैध धंद्यांबाबत यंत्रणेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना पुरेसी माहिती असतानाही ठोस कारवाई करण्याबाबत पावले उचलली जात नाहीत.
मोठ्या संख्येने गावोगावी देशी दारूचा पुरवठा केला जातो. ही दारू वाहनातून पुरविल्या जाते, अशी स्थिती ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.जत,उमदी,सांगोला,सांगली,मिरज येथील मुख्य बुकीचालक कल्याण-मुंबई चालवितात. शंभरावर एजंट चिठय़ा देऊन आकडे घेतात. दोन ठिकाणी क्लब चालतो. खुलेआम मटका व क्लब सुरू आहेत. अवैध दारू ही मोठय़ा प्रमाणावर विक्री होते.जत,उमदी पोलीस ठाणे हद्दीत मोठय़ा प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. या भागात देशी दारू व जुगाराचे प्रमाण जास्त असून क्लबची संख्याही लक्षणीय आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या स्पेशल टीमनेच तालुक्यातील काही मटका बहाद्दरांना पकडले खरे; परंतु, ही कारवाई औट घटकेची ठरली. पुन्हा अवैध धंद्यामध्ये वाढ झाली आहे.स्थानिक पोलीस कारवाई करत नाहीत.तर विशेष पथके कोमात गेली आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here