दारूबंदी करण्यासाठी महिला आक्रमक : बोर्गीत पोलीसाच्या साथीने सुरू असलेले अवैध धंदे बंद करा

0

करजगी,वार्ताहर : बोर्गी(खुर्द)ता.जत येथे दारूसह सर्व अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी महिलांनी ग्रामंपचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

तशा मागण्याचे निवेदन ग्रामसेवक दिले.तातडीने दारू बंदी न झाल्यास उमदी पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसणार असल्याचे यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले. 

जत पुर्व भागातील सिमावर्ती बोर्गीत उमदी पोलीसांच्या आर्शिवादाने मटका,जुगार,बेकायदा दारू उघडपणे विकली जात आहे.यात सामान्य नागरिकासह तरूण वर्ग,लहाने मुले वाया जात आहेत.या अवैध धंद्याच्या नादी लागून अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत.पोलीसात याबाबत वारवांर तोंडी तक्रारी करूनही त्यांची वरकमाई बुडते म्हणून ते या अवैध धंदे चालकांना पाठिशी घालत आहे.पुर्णत: दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष सभा घेण्यात यावी.येत्या काही दिवसात दारूविक्री न थांबल्यास मोठ्या प्रमाणात अहिंसक कृतीचा निर्णय महिलांनी यावेळी बोलून दाखविला होता.थेट उघड्यावर दारूविक्री होत आहे.मटका,तीनपानी जुगार,गांज्याचे झुरके उघड्यावर घेतले जात आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण असते. महिलांना पतीकडून मारहाण होत असते. त्यामुळे येथील दारू विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून विक्री थांबावी यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.दारूविक्रेत्यांकडून होणारा त्रास महिलांना जाचक ठरू लागला. बीट जमादार सहकार्य करीत नाही, त्यामुळे पोलीस पाटलांकडून अवैध विक्रेत्यांची यादी मागवावी, वरिष्ठांची कारवाई करावी, महिला कार्यकर्त्यांना ओळखपत्र द्यावे, त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, विक्रीचा गुन्हा अजामीनपात्र करावा, अवैध दारूविक्रेत्याचे प्रकरण सत्र न्यायालयात चालवावे, असा विक्रेता तीन वेळा पकडला गेल्यास त्याला जिल्ह्य़ातून हद्दपार करावे, अशाही मागण्या होतात.अशा मागण्या यावेळी उपस्थित महिलांनी केल्या.

बोर्गीसह पुर्व भागात शेकडो दारूविक्रेते सक्रिय

जत पुर्व भागातील बोर्गीसह अनेक गावात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैैध दारूविक्री केली जात आहे.एक हजार लोकसंख्येच्या गावात गावात 15/15 दारूविक्रेते सक्रीय आहेत. त्यामुळे परिसराच्या गावातीलही व्यसनी येथे दारू पिण्याकरिता येतात. गावातील अनेक युवक दारूच्या आहारी गेले आहेत. व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याने सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. त्यामुळे येथील पंधरा अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा महिलांनी दिला आहे.

बोर्गी बु.ता.जत येथील दारूसह अवैध धंदे बंद करावेत यासाठी महिला आक्रमक झाल्या आहे.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.