उमदी | उमदी पोलीस ठाणे बनलंय तडजोड ठाणे ? | काही कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक : कसल्याही गुन्ह्यात तोडपाणी

0

ठाण्याचा समोरील 12 दुकाने फोडलेल्याचा प्रकरणाचा आजही गुलदस्त्यात आहे.

जत,का.प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेवटचे टोक व सांगलीपासून सुमारे पावणेदोनशे किलोमीटर लांब असलेले उमदी पोलीस ठाणे तसे जिल्ह्यातील पोलीस 

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने  तडजोड ठाणे बनत आहे.किरकोळ प्रकरणे सोडाच येथे खून,बलात्कार,हाफ मर्डर सारख्या गंभीर गुन्ह्यातही तडजोड केली जात असल्याची चर्चा आहे.

जत तालुक्यातील क्राइम रेट कमी व्हावा व सीमावर्ती भागातील बेकायदा धंद्यांना आळा बसावा म्हणून उमदी येथे पोलीस ठाणे उघडण्यात आले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांने जनतेच्या हितासाठी पोलीस ठाणे बनविण्यापेक्षा कमाईचा व्यवसाय बनविला आहे.या ठाणे हद्दीतील कोंतेबोबलाद,पासून संख,माडग्याळ, जाडरबोबलाद पर्यत सर्वच गावात मटका,तीन पानी जुगार,वाळू,गांज्या,चंदन,शस्ञे तस्करी,सावकारी राजरोसपणे सुरू आहे.यापेक्षा गंभीर म्हणजे आंतरराष्ट्रीय तीन पानी जुगार अड्डे,चंदन,वाळू तस्करी व आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराचा वावर या भागात असतो.उमदी पोलीसांना या सर्व प्रकाराची कल्पना आहे.तरीही कारवाई होत नाही.

या शिवाय सर्वात वाईट प्रकार येथे घडत असून देशाच्या कायद्याला तिरांजली वाहून येथे येणाऱ्या फिर्यादीवर दबाव टाकून प्रकरण मिळविण्यात येत असल्याची चर्चा आहे. प्रकरणे मिटविण्यासाठी काही खास पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.मिटविण्यात येणाऱ्या किरकोळ प्रकरणांना पंचवीस हजार ते लाख रूपयापर्यत पैसे घेतले जात असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय गंभीर म्हणजे येथे बलात्कार, खून,हाफ मर्डर,शस्ञाची तस्करी सारखे गुन्हेही पोलीसांच्याकडून मिटविण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. खूनासारखे प्रकार अपघात घडविण्यापर्यत काही पोलीस व मध्यस्थी करणारे लोक कार्यरत असल्याचेही आरोप अनेक वेळा झाले आहेत.अशा प्रकरणात पाच लाख ते वीस लाखापर्यत तडजोड होत असल्याची चर्चा आहे.

पैसे असणाऱ्यांचे कोणतेही काम या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोलीस कर्मचारी व स्थानिक मध्यस्थी लोकाकडून होत असल्याची चर्चा आहे.अनेक प्रकरणात गरीब,महिला आरोपींना दमकाविणे,तुज्यावर दुसरी केस पडेल अशा भिती दाखवून फिर्यादीचा आवाज दाबविण्यात येत असल्याचेही आरोप आहेत.

अनेक आरोपी मोकाट

उमदी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अनेक आरोपी गुन्हे दाखल असूनही गावातच उथळ माथ्याने फिरत आहेत. पोलीसाच्या रेकार्डवर असलेल्या गुन्हेगार पोलीसांना महिन्याकाठी  लाखोचा हप्ता देऊन पुन्ह,पुन्हा गुन्हे करत असल्याचे आरोप आहेत.त्याशिवाय खून,बलात्कार, तस्करी,हाफ मर्डर सारख्या गुन्ह्यातील अनेक आरोपी मोकाट आहेत.पोलीसांनी त्यांना कागदपत्री फरारी घोषित केले आहेत.मात्र यातील अनेकजण बेधडक फिरत असल्याची चर्चा आहे.

Rate Card

कोटीपर्यत उत्पन्न

सिमावर्ती असलेल्या या पोलीस ठाण्याचे दोन नंबरचे उत्पन्न कोटीपर्यत असल्याचेही बोलले जात आहे.सर्व प्रकारचे धंदे येथे चालू आहेत. त्यामुळे ठाणेदार व कर्मचारी मालामाल होत आहेत.असे आरोप विधानसभेपर्यत झाले आहेत.मात्र बदल शून्य आहे.

मालमत्तेची चौकशी करा

या पोलीस ठाण्यात अनेक दिवसापासून काही कर्मचारी तळ ठोकून आहे.त्यातील काहीजण तालुक्यातील आहेत.सर्वाकडून पैसे मिळविणे हा उद्योग चालू असल्याचे आरोप माजी आमदारांनी नुसता जतेत नव्हे तर विधानसभेतही केला होता.आंदोलनेही केली होती. त्यामुळे कोट्यावधीची माया जमविणाऱ्या येथील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

वर्षभारातील शेकडो चोऱ्यांचे तपास नाहीत

उमदी गावात व परिसरातील गावामध्ये चोऱ्यांच्या अनेक

घटना घडल्या आहेत.यात लाखोचा मुद्देमाल चोरला गेला आहे.मात्र त्याप्रकरणी शेकडो चोऱ्याचे तपास लागलेच नाहीत. अद्याप एकही चोराना पकडल्याचे ऐकवत नाही पोलिसाकडून थांबा तपास चालू आहे,अशी नेहमी प्रमाणे उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे चोरटे सापडतच नसल्याने दुकानदार व घर फोडी झालेल्या घर मालकानी तक्रार देण्यासाठी पुढे होत नाहीत.उमदी पोलिसाकडून रात्री गस्त घालत असल्याचा शो दाखवला जातो मात्र,मध्यवर्ती चौकात चोरी होत असताना गस्त घालतातच कुठे ?गस्त घालत असल्यास चोऱ्या होतात तरी कसे?असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.