बसर्गीत बालिकेवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न

जत,प्रतिनिधी : बसर्गी ता.जत येथे साडेचार वर्षीय बालिकेवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 21 वर्षीय तरूणावर पोलीसात पोस्को अतर्गंत गुन्हा दाखल झाला.
किशोर राजेंद्र संकपाळ रा.बसर्गी असे संशयित तरूणाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, बसर्गी ता.जत येथे ओळखीचा फायदा घेत साडेचार वर्षीय अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून संशयित किशोर यांने स्व:ताच्या घरात नेहत अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केला.मुलीच्या आईला हा प्रकार कळाल्यानंतर संशयित किशोर विरोधात जत पोलीसात पोस्को(बाल लैगिंक अत्याचार)अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित किशोर संकपाळ याला अटक करण्यात आली आहे.