पंढरपूर-विजापूर महामार्ग कामातही जतवर अन्याय

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : पंढरपूर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग कामातही जत पुर्व भागात अन्याय केल्याचे चित्र आहे.जत तालुक्यातील उमदी, हळ्ळी,बालगाव,बोर्गी,कोतेंबोबलाद मार्गे विजापूरला जाणाऱ्या हा मार्ग उमदी नजिक जत तालुक्यात येताच निधी अभावी थांबविण्यात आला आहे.

जत पुर्व भागात देश स्वांतत्र झाल्यापासून दुर्लक्षित राहिला आहे.येथे रस्ते,सिंचन योजना हा कळीचा मुद्दा आहे. या भागातून जाणारा आंतरराष्ट्रीय महामार्ग कामातही जतवर राष्ट्रीय प्राधिकरणाने अन्याय केला आहे.मंगळवेढाकडून उमदी नजिकच्या चडचडण रोड पर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता करण्यात आला आहे. तेथून पुढे जत तालुक्याच्या हद्दीतून जाणारा रस्ता जूना त्यावरच डांबरीकरण करण्यात आले.काही महिन्यानंतर या महामार्गावर खड्ड्याची मालिका तयार झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे या रस्त्याची जबाबदारी आहे.खरेतर जत पुर्व भागातील गावाची या मार्गामुळे ओळख देश पातळीवर येणार आहे.त्यामुळे रस्ता पुर्ण करावा अशी मागणी आहे.मंगळवेढ्याकडून आलेला मार्ग उमदी गावापासून दिड किलोमीटर अंतरावरील चडचडण रोडपर्यत झाला आहे. तेथून पुढे सुमारे साठ किलोमीटरचा रस्ता जुना आहे.अनेकवेळा यावर खड्डे भरून डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र अवजड वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वांरवांर हा रस्ता दबला जाऊन खड्डेमय बनत आहे.सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे गरजेचे आहे. त्याशिवाय जत पुर्व भागातील जनतेच्या दळवळणाला गती देण्यासाठी सीमावर्ती असणारा हा रस्ता कर्नाटक, महाराष्ट्र जवळ आणणारा ठरू शकतो.

जत तालुक्यातील उमदी नजिक राष्ट्रीय महामार्गाचे काम थांबविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.