विजापूर-गुहागर महामार्ग चिरला

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात जाणाऱ्या विजापूर-गुहागर या राष्ट्रीय मार्गाचे सिमेंट कॉक्रीटचे काम गतीने सुरू आहे.मात्र रस्ता करताना खालचे मजबूतीकरण व्यवस्थित झाले नसल्याने महामार्गाच्या कॉक्रीट रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहे.भविष्यात पुन्हा अवजड वाहतूकीमुळे रस्ता दबून रस्त्याचे दोन भाग होण्याची भिती व्यक्त होत आहे.
जत शहर वगळता इतरत्र या मार्गाचे काम गतीने सुरू आहे. मोठा ठेकेदार व येथे या महामार्गाचे कार्यालय अथवा अधिकारी उपस्थित नसल्याने तक्रार करायची कोठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तातडीने या मार्गावरील रस्त्यावर भेगा दुरूस्त कराव्यात अशी मागणी होत आहे.
विजापूर-गुहागर महामार्गावर पडलेल्या भेगा