जतसह तालुक्यात साथीचे थैमान | बागेवाडीत डेंग्यूचे 25 हून अधिक रूग्ण,आरोग्य यंत्रणांचा गलथान कारभार

जत- प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यातील अनेक गावामध्ये डेंग्यू ,मलेरियासदृश तापाच्या साथीने थैमान घातले आहे.साथीचे अनेक रुग्ण तपासणीत आढळले होते.आता बागेवाडी या गावात डेंग्यू साथीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 25 हून अधिक जणांना साथीची बाधा झाली असून सांगलीतील भारती हाॅस्पिटल, व मिरज, जतमधील खासगी रूग्णांलयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जत शहरासह माडग्याळ,डफळापूर, गुड्डापूर अशा अनेक गावांमध्ये मागील महिन्यात डेंगू,मलेरियाचे अनेक रुग्ण आढळले होते.अनेक गावामध्ये चिंगनगुणीयाचा फैलाव होता. सध्या जत शहरातील दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. थंडी वाजून ताप येणे,अंग दुखी,डोकेदुखी अशी लक्षणे आढळून येतात. रक्ताचे नमुने तपासले असता शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यासाठी देशी औषधासोबत वैद्यकीय उपचार केले जात आहेत. विशेषत;मिरज येथील खाजगी दवाखान्यामध्ये व सांगलीतील भारती हाॅस्पिटलमध्ये जत तालुक्यातील बंहुतांश रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान बागेवाडी हे गाव डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येते. या गावात मागील 15 दिवसांपासून डेंग्यूच्या साथीचा जोरदार फैलाव झाला आहे.रक्ताचे नमुने तपासले असता डेंग्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांना रक्तामधील पेशी कमी होण्याची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या बागेवाडी येथील शिवाजी सोपान वाघमारे व केदारी शेकाप्पा तुपसौंदर्य यांना डेंग्यूची लागण झाल्याने सांगलीतील भारती हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शांताबाई वसंत वाघमारे,संगिता केदारी तुपसौंदर्य व शिवाजी वाघमारे यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर जतमध्येच उपचार सुरू आहेत.
गावात डासांचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्यामुळे गावामधील 25 हून अधिकजणांना डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
पपई,किवी,ड्रगनफुटची मागणी वाढली
साथीच्या आजारामध्ये व पेंशीची संख्या कमी होण्याच्या लक्षणामध्ये पपईच्या पानाचा रस,पिकलेली पपई,किवी,ड्रगनफुट या फळाचा उपचार प्रभावी मानला जातो.त्यामुळे या फळांना जत शहरात मागणी वाढली आहे.