अनैतिक संबधातून पत्नीचा खून | बिंळूर येथील घटना : मध्यरात्री आवळला गळा,संशयित पती ताब्यात

जत,प्रतिनिधी : बिंळूर ता.जत येथे 51 वर्षीय पत्नीचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीकडून गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी उघडीस आली.कस्तूरी मलाप्पा पाटील(वय 51,रा.बिळूर) असे मयत पत्नीचे नाव आहे.या प्रकरणातील संशयित पती मल्लाप्पा दुडांप्पा पाटील वय 53 हा पोलीसात हजर झाला आहे.याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात मयत महिलेचा भाऊ शिवाण्णा कल्लाप्पा महानिंगापगोळ (रा. कोट्टलगी ता. अथणी, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, मला एकूण चार बहिणी आहेत.शेवटची लहान बहीण कस्तुरी हिला बिळूर येथे दिले आहे. तिला दोन मुले आहेत.एक मुलगा आर्मीत दुसरा इस्लामपूर येथे नोकरीस आहेत.आरोपी मल्लाप्पा हा वारंवार चारीत्र्याच्या संशयावरून बहिणीस मारहाण करीत होता. गेल्या 10-15 वर्षापासून तो सतत त्रास देत होता. सारखे समजावून सांगून भांडणे मिटवून मुलाकडे बघून संसार कर, असे सांगून आम्ही बहिणीला सासरी पाठवित होतो. दोन महिन्यापूर्वीही असेच भांडण झाले होते. त्यावेळीही दोघांना समजावून समजूत घालून मी गावी आलो. त्यानंतर आज खून केल्याचे शेजाऱ्यांच्या फोनवरून कळाले तो तडक मी बिळूर गावी आलो तो पाहतो बहिणीचा गळा आवळून खून केल्याचे गळ्यावरील निशान्याने दिसले.
याबाबत जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपी मल्लाप्पा यास दुपारी जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.पती मल्लाप्पा पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी येत असताना त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले.अधिक तपास एपीआय कांबळे करत आहेत.खून प्रकरणाचे ग्रहण : जत तालुक्यात गेल्या आठवड्यातील हा तीसरा खून आहे.गुरूवार ता.5 ला जालीहाळमध्ये चुलत्याचा पुतण्यांनी खून केल्याचा प्रकार उघड झाला होता.त्यांच्या दुसऱ्या दिवशी जत शहरातील दुधाळवस्ती येथे मुलांने जन्म देत्या आईचा खून केला होता.त्यानंतर बिंळूरचा हा तीसरा खूनाचा प्रकार आहे. तीन्ही प्रकरणातील आरोपींना पोलीसानी ताब्यात घेतले आहे. मात्र जत तालुक्याला लागलेले खून प्रकरणाचे ग्रहण कायम असल्याचे सोमवारी पुन्हा समोर आले.
जवान मुलाच्या मध्यस्थीने आई कस्तूरी घरी
कस्तुरा आणि मल्लाप्पाचा मुलगा संजय हा आर्मीमध्ये नोकरीस होता. संजय दोन महिन्यापूर्वी सुट्टीवर आल्यानंतर तो आईच्या माहेरी कोटलगी, कर्नाटक येथे
तीला भेटायला गेला. त्यावेळी संजय याने तिच्या आईला घरी घेण्याबाबत विनंती केली. मी वडिलांशी बोललो आहे, आपण सर्वजन एकत्रीत राहण्याचे त्यानी सांगितल्याचे संजयने कस्तुराला सांगितले आणि घरी येण्यासाठी राजी केले. त्यामुळे कस्तुरा हिने मुलाचे ऐकत पतीच्या घरी राहायला आली होती. मल्लाप्पाचा दुसरा मुलगा कामानिमित्त
कोटलगी येथे रविवारी रात्री गेला होता.त्याचा फायदा घेत मल्लाप्पाने गळा आवळला.
Attachments area