पैसे देवाण-घेवाणवरून एकावर चाकूने हल्ला | जत महाविद्यालयातील प्रकार : एकजण गंभीर

जत,प्रतिनिधी : पैशाच्या देवाण घेवाणीवरून येथील राजे रामराव महाविद्यालयात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यात झालेल्या माराहाणीत चाकूने हल्ला केल्याने एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.सकाळी सात वाजता महा विद्यालयाच्या आवारात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. प्रदिप मधूकर शिंगाडे वय 17,रा.जत असे जखमी शाळकरी युवकाचे नाव आहे. तर प्रकाश बाळासो कदम वय 18 रा.डफळापूर यांने हा हल्ला केला आहे.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.प्रकाश कदम याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, प्रदिप शिंगाडे हा 11 कॉमर्समध्ये तर प्रकाश कदम हा 12 वी सायन्समध्ये शिकत आहे.ओळखीवरून दोघात पैसे देवाण-घेवाण होत होती.मात्र गेल्या काही दिवसापासून दोघात वाद निर्माण झाला होता.शनिवारी सकाळी महाविद्यालयात सुरू असलेल्या परिक्षेसाठी दोघे विद्यार्थी आले होते.महाविद्यालय परिसरात पुन्हा त्यांच्या बाचाबाची झाली.प्रकाश कदम यांनी सोबत आणलेल्या चाकूने प्रदीप शिंगाडे यांच्या पोटात खुपसला.त्यात प्रदिपला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारार्थ मिरज येथे हलविण्यात आले.दरम्यान तातडीने पोहचलेल्या पोलीसांनी प्रदिप कदमला ताब्यात घेतले.पैशाच्या कारणावरून हे कृत्य केल्याचे प्रदिपने पोलीसांनी कबूली दिल्याचे माहिती मिळते.
दरम्यान महाविद्यालय परिसरात उद्भवलेल्या या घटनेने विद्यार्थ्यात भितीचे वातावरण पसरले आहे. महाविद्यालयातील वाढेलेली गुन्हेगारी वृत्ती चिंतेचा विषय बनली आहे.बाहेरून येणाऱ्या काही तरूणाचा वावर वाढल्याने महाविद्यालयात भाईगिरी,सावकारी वाढत असल्याचे विविध घटनावरून समोर येत आहे. पोलीसांची खरच यावर नजर आहे असे सध्यातरी अस्पष्ट दिसत आहे.