नियमबाह्य वडाप चालणार नाही : आर.आर.शेळके

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरात बेशिस्त पणे वाहने लावून वाहतूकीला अडथळा करणाऱ्या काळी-पिवळी गाड्याने नियमबाह्य वडाप केल्यास कारवाई करू असा इशारा पोलीस निरिक्षक आर.आर.शेळके यांनी दिला.

चार दिवसापुर्वी स्टँड परिसरात थेट रस्त्यावर लावलेल्या काळी-पिवळी गाड्यावर जत पोलीस ठाण्याला नव्याने आलेले पो.नि.शेळके यांनीकारवाईचा दणका दिला होता.त्यादरम्यान एका वाहनाची काच फुटल्याने वडाप चालक-मालकांच्या संघटनेने बंद पुकारत आम्हाला पर्यायी जागा द्या,अशी मागणी केली होती.त्या अनुषंगाने शनिवारी पुन्हा वडाप संघटनेेचे पदाधिकारी व पोलीसात बैठक झाली.वडाप चालक-मालकाकडून पर्यायी जागा द्या,नियमात शिथिलता आणा अशी मागणी केली.मात्र काळी-पिवळी गाड्यात कसल्याही प्रकारे नियमबाह्य प्रकार मी खपवून घेणार नाही.मालक-चालकांना इनीफॉर्म,बँच,कागदपत्रे,प्रवाशाची ठरलेले संख्या हे नियम पाळावेच लागतील.शहरातील रस्त्यावरवाहने उभी केल्यास कारवाई करणार,जागा व अन्य बाबीसाठी संबधित खात्याकडे पाठपुरावा करावा,असे यावेळी शेळके यांनी सांगितले.दरम्यान शनिवारीही वडाप चालक-मालकांनी वाहने बंद ठेवल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.