महसूलच्या भष्ट्र अधिकाऱ्यांना निलबिंत करा | सामाजिक कार्यकर्त्याचे आमरण उपोषण

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत महसूल विभागातील शेतकऱ्यांना पैशासाठी छळणाऱ्या भष्ट्र अधिकाऱ्यांना निलबिंत करा अशा मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महादेव हुचगोंड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.हुचगोंड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,जत महसूलच्या अधिकारी,मंडल अधिकारी तलाठी यांची साखळी असून कोणत्याही काम पैशाशिवाय या साखळीकडून केले जात नाही.नियमानुसार कागदपत्रे असतानाही वजनाची अपेक्षा केली जाते.पैसे न देणाऱ्या शेतकऱ्यांचे कामे अडविली जात आहे.पैसे देणाऱ्याचे बोगस नाव लावण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे.जत तहसिलदार कार्यालय येथे फेरफार नोंदीबाबतचे तक्रार रजिस्टर चालू असतांना फेरफार मंजूरीस नसतांनाही फेरफार नोंदवून सातबारा उताऱ्यावरती नाव दाखल करुन ऑनलाईन फेरफार बेकायदेशीर दिला जात आहे.गावकामगार तलाठी, खोजनवाडी यांच्याकडून असे प्रकार घडत आहेत.याला संबंधीत वरीष्ठ संबंधीत विभागाचा छुपा पाठिंबा आहे.तलाठी कार्यालयामार्फत चुकीच्या नोंदी करणे सातबारा मधील नावे कमी जास्त करणे,वेळेत कामे न करणे, दप्तर दिरगांई करणे,कागदपत्री हेराफेरी करणे,अरेरावीची भाषा वापरणे,असे

प्रकार घडत आहेत.सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे अधिकारी दमदाटी करत आहेत.दुसरीकडे एंजन्टगिरी करणाऱ्यांचे स्वागत केले जाते.जतच्या महसूल विभागात सर्वच विभागात लाच घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत.साध्या शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंत असे प्रकार केले जात आहेत.सामान्य शेतकऱ्यांना पैशासाठी नडविले जात आहे.कागदपत्रे देताना पैसे असल्याशिवाय कामे होत नाहीत.नाहीतर त्रुटी काढून त्यांची हेळसांड केली जात आहे.महसूलच्या या भष्ट्र यंत्रणेला वरिष्ठाचा पाठिंबा आहे.त्यामुळे मनमानेल तसा प्रकार केला जात आहे. त्यामुळे या भष्ट्र तलाठी,मंडलअधिकारी,अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे हुचगोंड यांनी सांगितले.

जत महसूल प्रशासनातील भष्ट्र अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते महादेव हुचगोंड

अनेक वर्षापासून ठिय्या मांडलेल्या अधिकाऱ्यांकडून लुट

तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून चुकीचे कामे होत आहे,यामुळे शासकीय योजनेचा लाभ व बँकेची कामे करतांना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. या नुकसानीस जत तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी जबाबदार आहेत.अनेक वर्षापासून असे अधिकारी तालुक्यात तळ ठोकून आहेत.त्यांचा कालावधी पुर्ण होऊनही बदली होत नाही.तेच भष्ट्र कारभार करण्यात आघाडीवर आहेत.त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी. (नियम 1966 च्या कलम 155 नुसार).

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.