जत शहरात रिंगरोडची गरज
जत : जत शहरात रिंगरोड बाय पास अथवा उड्डाणपूल करण्याची गरज आहे.शहरातून मोठे चार महामार्ग जात असल्याने आता व भविष्यातही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
गुहाघर-जत-विजापूर 166 ई लांबी 55 किमी,जत-सांगोला-इंदापूर 965 जी लांबी 20 किमी,कराड-तासगाव-क.महकाळ-जत 266 लांबी 23 किमी,जत-अथणी-गोकाक(बेळगाव) क्रमांक मिळणार आहे लांबी 26 किमी
हे राष्ट्रीय महामार्ग जत शहरातून जाणार असल्यामुळे शहरात वाहनांची वर्दळ वाढणार आहे.त्यामुळे जत शहरात वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे .तसेच चारही रस्ते राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्यांची वेगमर्यादा सुद्धा जास्त असल्यामुळे शहरात गंभीर प्रकारचे अपघात होण्याची शक्यता दाट आहे.अश्या कारणामुळे जत शहरात रिंग रोड बाय पास अथवा उड्डाणपूल करण्याची गरज आहे.बायपासचा जत शहराला होणार फायदा- बायपास मुळे अनेक जत शहराचा विस्तार होवून उद्योगधंदे ही वाढतील.
