अमृत्तवाडीत शेतकऱ्यांची कर्जास कंटाळून आत्महत्या

0
2

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अमृत्तवाडी येथे शेतकऱ्यांने कर्जास कंटाळून गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडीस आली.तुकाराम धोंडी केदार वय -50 रा.अमृत्तवाडी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.शुक्रवारी सकाळी साडेसातच्या आसपास ही घटना घडली.पोलीस व घटनास्थंळावरून मिळालेली माहिती अशी,शेतीसाठी काढलेले साडेतीन लाख रूपये कर्ज काढले होते.तीन एकरापैंकी दीड एकरमध्ये द्राक्षबाग होती.बागेसाठी तीन बोअरवेल्स खोदूनहीही पाणी लागले नव्हते.गेल्या वर्षी टँकरने पाणी घालून बाग जगविली होती.यंदा पाण्याअभावी बाग वाळली होती.पाणी पुरत नसल्याने गेल्या आठवड्यापासून बाग तोडून काढण्यात येत होती.शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे कसे या दबावात ते होते.अशा परिस्थितीत बँकेने कर्ज वसूलीची नोटीस केदार यास काढली होती.त्या मानसिक दबावातून त्यांनी शुक्रवारी सकाळी लगतचे शेतकरी बंडू शंकर केदार यांच्या गट नं.60 पश्चिम बाजूच्या शेतातील बांधानजिकच्या असणाऱ्या लिंबाच्या झाडास दोरीने गळपास लावून आत्महत्या केली.त्यांच्या पश्चात दोन पत्नी,मुले दोन,तीन मुली असा परिवार आहे.सर्व मुली व एका मुलाचा विवाह झाला आहे.दरम्यान सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आता मुत्यू पंताला आलेले आहेत.त्यामुळे शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी होत आहे.

अमृत्तवाडी : मयत शेतकरी तुकाराम धोंडी केदार यांची हिच ती वाया गेलेली द्राक्ष बाग तोडली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here