अवकाळीची नुकसान भरपाई तोकडी | पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ द्या : विक्रम ढोणे

0

जत : अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकऱ्यांची निराशा झाली असून, आता पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ मिळाला पाहिजे, अशी आशा पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Rate Card

गत महिनाभराच्या कालावधीत बरसलेल्या अवकाळी पावसाने जतसह राज्यभरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब,मका,ज्वारी,तूर, इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून 16 नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत मर्यादेत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 18 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च आणि पिकांचे बुडालेले उत्पादन बघता, पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. पीक नुकसान भरपाईच्या सरकारी मदतीने निराशा केली असल्याने, आता किमान पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


पंचनामे ग्राह्य धरून पीक विम्याचा लाभ द्या! : विक्रम ढोणेअवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात 1 कोटी 12 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले; मात्र पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा रकमेचा भरीव लाभ मिळाला पाहिजे.

महसूल, कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पीक नुकसानाचे पंचनामे ग्राह्य धरून, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी सामाजिक नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.