जत रोड स्टेशनवरून एप्रिल 2020 इलेक्ट्रिक रेल्वे धावणार
जत : जत रोड रेल्वे स्टेशनवर 4 एप्रिल 2020 ला इलेक्ट्रिक रेल्वे धावणार आहे.इलेक्ट्रिक रेल्वे सुरू झाल्यानंतर या मार्गावरून लांब पल्याच्या रेल्वे सुरू करण्याची तयारी रेल्वे बोर्डाकडून सुरू झाली आहे.

बेंगलोर-दिल्ली राजधानी एक्सप्रेस गोवा-दिल्ली,नागपूर वॉस्को आणि पुणे मुंबई सारख्या अति जलद तसेच अत्यंत लांब पल्याच्या अशा अनेक सुपर फास्ट रेल्वे गाड्या या मार्गानेच सोडण्याची तयारी रेल्वे बोर्डाने केली आहे.लातुरच्या खासदारांनी लातूर येथे रेल्वे कोच फँक्टरीचे काम चालू असल्याने डब्बल लाईन सुद्धा प्रस्ताव दिला होता.त्याचेही रेल्वे बोर्डाकडून लवकरच चालू होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मिरज – पंढरपूर रेल्वे मार्गावरील इलेक्ट्रिक जोडणीचे काम झाले आहे.