संखच्या शिक्षण संस्थेविरोधात शिक्षकांचे उपोषण

सांगली : संख (ता.जत) येथील शिललिंगेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात संख येथील गुरुबसव विद्यामंदिर व ज्यु काॅलेजचे मुख्याध्यापिका व शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर शुक्रवारी उपोषण करण्यात आले.निवेदन व आंदोलन कर्त्यांनी सांगितले की,या संस्थेचे चेअरमन मनमानी करतात,शिक्षक व मुख्याध्यापकांना धमकावतात, दबाव टाकतात, शिक्षकांना अपशब्द बोलतात,मानसिक त्रास देतात.शनिवार दि.31ऑगस्ट सर्व शिक्षकांची मिटींग घेऊन दोन महिन्याच्या न मिळालेल्या पगाराबाबतच्या चर्चामध्ये सह-शिक्षक शिवानंद धन्याळ यांना चेअरमन व त्यांचा मुलगा यांनी आर्वाच्च भाषेत शिवीगाळी केली,मारण्यासाठी अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार झाला होता.शिक्षण विभागाचा कोणतेही आदेश नसताना सर्व कर्मचाऱ्यांना शंभर रुपयेच्या बॉण्डपेपर वर कुटुंब मर्यादा प्रमाणपत्राची मागणी करत आहेत.आमची शिक्षक म्हणून नियुक्तीच्या वेळी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे आम्ही सादर केलेली आहेत.असे असतानादेखील विनाकारण शंभर रुपये बॉण्डपेपर कुटुंब मर्यादा प्रमाणपत्राची मागणी करीत आहेत.चेअरमन यांनी मुख्याध्यापिकाकडे असणारे शिक्षक हजेरी पत्रक काढून घेतले आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी दुसरे हजेरी पत्रक शिक्षणाधिकारी(माध्य) यांच्या परवानगीने तयार केले आहे. परंतु नियमबाह्य पद्धतीने दुसरे हजेरीपत्रक उपमुख्याध्यापिकाकडे ठेवले आहे. शाळेत दोन-दोन हजेरी पत्रकावर शिक्षक सह्या करीत आहेत.त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. शिक्षकांनी नेमक्या कोणत्या मस्टरवर सही करावी हे कळत नाही.शिक्षकांना नोटीस काढून उपमुख्याध्यापिकाच्या जवळ असणाऱ्या मस्टरवरच सही करण्याचं नोटीस काढली आहे.सही नाही केली तर गैरहजेरी मांडण्यात येईल अशी धमकी वजा नोटीस देण्यात आली आहे.शाळेचा प्रमुख हा मुख्याध्यापक असतो.शाळेतील सर्व दप्तर व सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व्हिसबुक मुख्याद्यापक कार्यालयातून परस्पर ताब्यात घेतले आहेत.त्यामुळे शालेय कामकाज करणे कठीण झाले आहे.वेतन पडताळणीसाठी सर्व्हीसबुक मागणी केली असता चेअरमन यांनी देण्यास नकार दिला आहे.त्यामुळे अजून वेतन पडताळणी झालेली नाही.याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.शालेय कामकाज चालविण्यासाठी पगारातून टक्केवारीची मागणी करीत आहेत.कर्नाटकात पत्राद्वारे बी.एड.पदवी घेतलेली पदवीला शासनाची मान्यता नाही.असे असताना बेकायदेशीरपणे सेवाज्येष्ठता डावलून आपल्या सुनबाईला बी.एड.स्केल व उपमुख्याध्यापकपदी बढती दिली आहे.यामुळे सिनिअर शिक्षकावर अन्याय केला आहे.आपण या विषयामध्ये लक्ष घालून चेअरमन कडून नोटीस देणे,दुस-या हजेरी पत्रकावर सही करणे,मुख्याध्यापक पदावरुन काढण्याची धमकी देणे,मानसीक त्रास देणे, टक्केवारी वसुली या सर्व प्रकरणाची चौकशी करावी,यासाठी हे उपोषण करण्यात आले.उपोषणाला शिक्षण सभापती तम्माणगौडा पाटील, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे पुणे विभाग अध्यक्ष राजेंन्द्र नागरगोजे ,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ सातपुते, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर माने राज्य उपाध्यक्ष एन. डी.बिरनाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी भेट देवून पाठिंबा दिला.उपोषणात मुख्याध्यापिक जोती पाटील,सहशिक्षक जी.आर.पाटील,शिवानंद धन्याळ आदीसह शिक्षक सहभागी झाले होते.
त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूकदरम्यान उपोषणाची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी त्वरीत त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूकीचे लेखी आदेशाचे पत्र उपोषण कर्त्या शिक्षकांना दिले आहे.
संख (ता जत) येथील गुरुबसव विद्यामंदिर व ज्यु काॅलेज मधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर उपोषण करण्यात आले.