जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात विधानसभेपुर्वी झालेली जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची नोंदणी करून तालुक्यातील प्रश्नासाठी या आघाडीच्या माध्यमातून काम करणार असल्याची माहिती आघाडीचे समन्वयक रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.जमदाडे म्हणाले,जत तालुक्यात जत विकासाठी आम्ही एकत्र आलो होतो.या विकास आघाडीच्या माध्यमातून डॉ.रविंद्र आरळी यांनी विधानसभा निवडणूक लढवून पंचवीस हजारावर मताधिक्य मिळविले आहे.या आघाडीला स्वतंत्र जनाधार मिळाला आहे.त्यामुळे यापुढेही या आघाडीतून जतच्या म्हैसाळचे रखडलेले काम,विस्तारित योजना,तालुक्याचे विभाजन,रस्ते,आरोग्य,पुर्व भागातील जनतेच्या प्रश्नावर आमचा लढा सुरू राहणार आहे.जमदाडे म्हणाले,आघाडीचे नेते सुरेश शिंदे,बसवराज पाटील,डॉ.रविंद्र आरळी,मन्सूर खतीब तम्माणगोंडा रवीपाटील,चंद्रकात गुड्डोडगी, अँड.धोंडमणी,संजय तेली आदींची बैठक झाली आहे.तालुक्यातील हितासाठी आम्ही या आघाडीला कायम ठेवणार आहोत.तुर्त कोणत्याही पक्षात आमच्यापैंकी कोणतेही नेते जाणार नाहीत.जतच्या विकासाला महत्व देणे हाच आमचा प्रमुख उद्देश आहे.असेही जमदाडे यांनी सांगितले.