सत्य परमात्म्याची ओळख करुन आपले जीवन उज्वल करा

0
Rate Card

समालखा (हरियाणा): 19 नोव्हेंबर, 2019 सत्य परमात्म्याची ओळख करुन जेव्हा आपण या कायम-दायम राहणाऱ्या निराकार प्रभुशी आपले नाते जोडतो तेव्हा घटाघटातून याचेच चैतन्य सर्वांठाई दिसू लागते. हीच आमची ओळख बनून जाते आणि अवघे जग आम्हाला विश्वबंधुत्वाच्या भावनेने ओतप्रोत दिसू लागते. ब्रह्मज्ञान प्राप्त होताच आमच्या जीवनात उज्वलता येते आणि आम्ही जगाशी सद्व्यवहार करु लागतो. निरंकार प्रभुने कृपा करावी आणि हा भाव कायम टिकावा, आपण हा पावन संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवू शकू.72 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या उद्घाटनप्रसंगी समागमाच्या पहिल्या दिवशी मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी वरील उद्गार काढले.16,17 व 18 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित केलेल्या या संत समागमामध्ये देश-विदेशातून लाखो भाविक-भक्तगणांनी भाग घेतला. मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून या समागमामध्ये सुमारे 1 लाख भाविक सहभागी झाले असून त्यापैकी सुमारे 10 हजार निरंकारी सेवादल स्वयंसेवक आहेत ज्यांनी समागमामध्ये विभिन्न सेवांमध्ये भाग घेतला.सुमारे 600 एकर परिसरात पसरलेल्या संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाचे संपूर्ण वातावरण धन निरंकारच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते आणि चहुकडे श्रद्धा, भक्ती, प्रेम आणि उल्हासाचा सुगंध दरवळत होता.  

समागमाच्या पहिल्या दिवशीच्या खुल्या सत्रामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी लाखोंच्या जनसागराला संबोधित करताना प्रतिपादन केले की, “सुख-दु:खाच्या पलिकडे जाऊन सहज अवस्थेमध्ये आनंदमय जीवन जगण्याचे नाव भक्ती होय.सद्गुरु माताजींनी सांगितले, की सत्याचा बोध झाल्यानंतर आपण ईश्वराची जाणीव ठेवून आपले प्रत्येक काम करु लागतो आणि मनामध्ये ईश्वराच्या प्रति कृतज्ञतेचा भाव बाळगतो, ज्यायोगे आम्हाला शाश्वत आनंद प्राप्त होतो.समागमाचा मुख्य विषय संत निरंकारी मिशनच्या 90 वर्षांच्या दैदिप्यमान इतिहासावर प्रकाश टाकताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की मिशनच्या प्रारंभिक संदेशवाहकांनी भौतिक साधनांचा अभाव आणि विपरित परिस्थितीचा सामना करत मानवकल्याणासाठी दृढसंकल्प राहून आपले जीवन समर्पित केले. त्यामध्ये सद्गुरु माताजींनी मिशनचे संस्थापक बाबा बूटासिंहजी, त्यांच्यानंतर मिशनची धुरा सांभाळणारे बाबा अवतारसिंहजी, जगतमाता बुद्धवंतीजी, बाबा गुरबचनसिंहजी, निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी, बाबा हरदेवसिंहजी, निरंकारी माता सविंदरजी यांच्या महान योगदानाचे स्मरण करुन दिले. पुरातन युगांमध्ये जो सत्य, प्रेम, एकत्वाचा संदेश दिला गेला तोच संदेश आजही संत निरंकारी मिशन पुढे घेऊन जात आहे. 

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.