परतीच्या पाऊसात नुकसानीचे सरसकट भरपाई द्यावी | सोमनिंग बोरामणी यांची मागणी

जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील उमदी जिल्हा परिषद मतदार संघातील पंतप्रधान किसान योजनेतील संबधित कर्मचाऱ्यांनी शासनाला व्यवस्थित माहिती न भरल्याने 50 टक्के लाभार्थी वंचित राहिले आहे.आताही मान्सून रिटर्न पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुर्व भागातील नेते सोमनिंग बोरामणी यांनी केली.शासनाकडून बेजबाबदार पणा झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही बोरामणी यांनी दिला.
जत पुर्व भागात गेल्या सहा महिन्यापुर्वी दुष्काळाने फटका बसला होता.पंतप्रधान किसान योजनेचाही लाभ मिळाला नाही.आताही गेल्या महिन्यात परतीच्या झालेल्या पाऊसाने शेतीची अतोनात नुकसान झाले आहे.ऐन भरात असलेल्या द्राक्ष,डाळिंब,तुर,मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.कृषी विभागाकडून पंचनामे करतानाही दुजाभाव केला जात आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत.द्राक्ष व डाळिंब बागायत शेतकऱ्यांना हेक्टरी एका लाख व तुर मका उत्पादित शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार नुकसान भरपाई दिल्यास त्यांना जिवदान मिळणार आहे.त्यामुळे शासनाने परिस्थितीचा अभ्यास करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोरामणी यांनी केली.
प्रत्यक्षात गावातील पावसाच्या नोंदीनुसार नुकसान भरपाई द्या.
उमदीतील हवामान केंद्रनुसार बेंळोडगी,करजगी,बालगाव,हळ्ळी या दहा किलोमीटर वरील गावांनाचेही त्यानुसार मूल्यांकन केले जाते.मात्र प्रत्यक्षात उमदी पेक्षा जास्त पाऊस या गावांना पावस जादा पडला आहे.त्यांची वस्तुनिष्ठ पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी.प्रत्येक गावात हवामान माफन केंद्र बसवावे असेही बोरामणी यांनी मागणी केली.