जत,वार्ताहर : जिल्हा पोलीस प्रमुख सहेल शर्मा यांच्या कारकिर्दीत क्राईम रेट वाढला असल्याचा जोरदार आरोप भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत केला.विलासराव जगताप म्हणाले की गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात खन दरोडा मारामारी अवैध धंदे वाढले,असून जिल्ह्यात खाजगी सावकारांनी उच्छाद मांडला आहे. असे असताना पोलीस प्रशासन या हे सर्व केवळ.बघ़्याची भुमिका घेत आहे हे सर्व अवैध धंदे रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.
को.बोबलाद येथे तडीपार केले गुंडांनी दिवसाढवळ्या येऊन मतदान केले.गावागावात राजरोसपणे वसुली करत आहेत. हे सर्व उमदी पोलिसांना माहिती असून सुद्धा ते कानाडोळा करत आहेत.या सर्व गुंडांना पोलिसांचेच अभय असल्याचा आरोप जगताप यांनी
केला.जगताप पुढे म्हणाले की जत शहरात वाहतूक पोलीस नावालाच असून ते वसुली करण्यात व्यस्त जत शहरात वाहतुकीची कोडी मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच काळ्यापिवळ्या गाड्या रस्त्यावर उभ्या केलेजातात.त्यामुळे स्टँड परिसरात कोंडी होऊन कधी कुणाचा जीव जाईल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. हे सर्व पोलिसांना माहित आहे,तरीही आर्थिक लाभापोटी पोलीस अधिकारी कारवाई करत नाहीत,असा आरोपही आ.जगताप यांनी केला.





