गुड्डापूरला जोडणारे रस्ते दुरूस्त करा | आ.विक्रमसिंह सांवत : श्री.दानम्मादेवी यात्रा,आढावा बैठक संपन्न

0

संख,वार्ताहर : गुड्डापूर ता.जत येथील श्री.दानम्मादेवी देवस्थान यात्रेच्या नियोजनाच्या पाश्वभूमीवर आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली.यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारे भाविकांना अडचण भासणार नाही यांची खबरदारी प्रशासनाने घ्याव्यात तसेच प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सुचना आ.विक्रमसिंह सावंत यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार सचिन पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ,देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रकाश गणी,संचालक चंद्रशेखर गोब्बी, सिध्दया स्वामी,भीमण्णा पुजारी,सचिव विठ्ठल पुजारी,उपसंरपच चंद्रशेखर पुजारी,ग्रामसेवक ओलेकर,गणी मुल्ला तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Rate Card

दानम्मादेवीची कार्तिक यात्रा सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर ते बुधवार दि. 27 नोव्हेंबर होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या तयारीला वेग आला आहे.आमदार विक्रमसिंह सावंत यांनी यात्रेच्या सर्व नियोजनाचा आढावा घेतला.गुड्डापूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यावरील झाडे-झुडपे काढून खड्डे,साईटपट्ट्या भरून घ्याव्यात असे आदेश दिले.

यात्रेसाठी जत एसटी आगाराच्या वतीने 50 बस गाड्यांचे नियोजन केले असल्याची माहिती एसटी डेपोचे अधिकाऱ्यांनी सांगितले.यात्रेसाठी आरोग्य विभागामार्फत प्राथमिक औषधे,आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.यात्रेसाठी 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

गुड्डापूर ता.जत येथील श्री.दानम्मादेवी यात्रेच्या आढावा बैठकीत आ.विक्रमसिंह सांवत,डीवायएसपी दिलीप जगदाळे,तहसीलदार सचिन पाटील,प्रंशात पिसाळ आदी

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.