जत तालुक्यातील विविध मागण्यासाठी भाजपच्यावतीने बुधवारी सांगलीत उपोषण

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : मान्सून रिटर्नच्या पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी,शहरातील अस्वच्छता, रोगाचे थैमान,तालुक्यातील खड्डेयुक्त रस्ते तातडीने दुरूस्त करावेत आदी मागण्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली येथे बुधवार,ता.20 रोजी उपोषणास बसणार असल्याची माहिती शुक्रवारी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत देण्यात आली.

यावेळी माजी आमदार जगताप यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सुनिल पवार,रेखा बागेळी,मंगल नामद,उमेश सांवत आदीसह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या मागण्याचे निवेदन जत भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,गेल्या वर्षी अवर्षणामुळे वाया गेलेल्या रब्बी पिकाची नुकसान भरपाई उद्याप मिळाली नाही,यावर्षी परतीच्या पावसाने पुन्हा रब्बी व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले,त्यांचे पंचनामे झालेले नाहीत,त्यांचीही नुकसान भरपाई मिळालेली नाही.जत शहरात विविध साथीचे थैमान घातले आहे,स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपरिषदच्या दुर्लक्षांने नागरिकांचे हाल सुरू आहेत.नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात नगरसेवकांनी टाळे टोकण्यासह विविध आंदोलने करूनही सुधारणा होत नाही.तालुक्यातील रस्ता कामाच्या सुमार दर्जामुळे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य आहे.त्यांची चौकशी व्हावी,तालुक्यात अवैध धंदे बेधडक सुरू आहेत.सावकारी,गुंडगिरी फोफावली असून त्यामुळे सामान्य नागरिकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.त्यावरही पोलीसाकडून कारवाई होती नाही.आदीसह विविध मागण्यासाठी वारवांर सुचना देऊनही तालुका प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग यावी म्हणून उपोषण करणार आहोत. तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या उपोषणास बसणार आहेत,असे कार्याध्यक्ष सुनिल पवार यांनी सांगितले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.