जत शहरातील महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करा जत शहरातील महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करा आ.विक्रमसिंह सांवत यांचे आदेश : स्वच्छता,आरोग्य सुविधेबाबत नगरपालिकेला सुनावले : आ.विक्रमसिंह सांवत यांचे आदेश | स्वच्छता,आरोग्य सुविधेबाबत नगरपालिकेला सुनावले

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करा, तसेच या मार्गावर दुभाजक  बसविण्याचे आदेश आ.विक्रमसिंह सावंत यांनी दिले.राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे त्यासाठी तरतूद नाही,त्यामुळे ते काम नगरपालिकेकडून करावे असेही आदेश आ.विक्रमसिंह सांवत यांनी दिली.

दरम्यान दिड महिन्यात शहरातील काम पुर्ण करतो असा शब्द ठेकेदारांनी यावेळी दिला.एका बाजूने लगेच काम सुरू करण्यात येईल,असेही ठेकेदारांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Rate Card

शहरातील रस्ता कामासंदर्भातील बैठकीला आ.सांवत यांच्यासह तहसीलदार सचिन पाटील,नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनावर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी,बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजयकुमार ठोंबरे,बाबासाहेब कोडग,नाना शिंदे,आप्पाराया बिराजदार,भूंपेद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.जत शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसापासून रखडले आहे.अनेक दिवसापासून या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकासह नागरिकांना मोठा त्रास होत होता.त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन केले होते.सहा महिन्यापुर्वी या महामार्ग कामाची मुदत संपली आहे.मात्र जत शहरातील काम रखडले आहे.त्याचा जाब संबधित अधिकारी व ठेकेदारांना विचारला.ठेकेदारांनी सांगितले, भूमीसंपादनाचे वाद होते तेथे काम पुर्ण करता आलेले नाही.शहरातील पाण्याच्या पाईपलाईन स्थंलातर झाले नाही,त्यामुळे शहरात काम सुरू करता आलेले नाही.तर एका बाजूचे काम तातडीने सुरू करावे,यल्लम्मा यात्रे अगोदर हे काम पुर्ण करावे,पाईपलाईनचे काम तातडीने करावे असे आदेश आ.सांवत यांनी दिले.ठेकेदारांनी दीड महिन्यात हे काम पुर्ण करतो असे आश्वासन दिले.शहरातील स्वच्छता,साथीच्या आजाराबाबत मुख्याधिकारी अभिजित हराळे यांची आ.सांवत यांनी चांगलीच कानउघडणी केली. जत शहरात प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत.तेथेच भटकी कुञी,जनावरांचा वावर आहे.प्रंचड दुर्गंधी हे शहराला अशोभनीय आहे.त्यावर तातडीने कारवाई करत डेपोची विल्हेवाट लावा,साथीच्या आजाराबाबत आरोग्य कर्मचारी जादा नेमून कारवाई करा,अशा कडक शंब्दात आदेश आ.सांवत यांनी यावेळी मुख्याधिकारी यांना दिले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.