मुलांचे पहिले गुरू आई-वडिल तर दुसरे शिक्षक : दिलीप जगदाळे निर्भया पथकाकडून बालदिनानिमित्त खाऊचे वाटप

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातील मुबधीर,मुलांची मतीमंद शाळा व मदरसा शाळेत निर्भया पथकाच्या वतीने डिवायएसपी दिलीप जगदाळे यांच्या हस्ते खाऊ व फळाचे वाटप करण्यात आले.यावेळी पो.नि.शेळके,श्री.जोशी सर,सा.पो.नि.श्री.कांबळे,निर्भया पथकाचे कर्मचारी गोविंद चव्हाण, गजेंद्र भिसे उपस्थित होते.

Rate Card

यावेळी बोलताना डिवायएसपी दिलीप जगदाळे म्हणाले,

देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज इथे त्यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यांनी आपल्या विकासकार्यात बाल कल्याण उपक्रमांना मोठं प्राधान्य दिलं. मुलांवर योग्य संस्कार व्हावेत याबाबत ते आग्रही होते. त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत. मुलांचे पहिले गुरू आई-वडिल तर दुसरे शिक्षक असतात त्यामुळे त्यांच्या मनावर उत्तम संस्कार करणं ही त्यांची जबाबदारी असते. असे त्यांचं म्हणणं होतं. मुलांचे अधिकार, शिक्षण आणि मुलांच्या जडणजघडणीबाबत पालकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात नेहरुंचा मोलाचा वाटा आहे.

जत येथे निर्भया पथकाकडून बालदिनानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.