आंवढी | तब्बल चाळीस वर्षानी झाली मायलेकराची भेट

0
Rate Card

आंवढी,वार्ताहर : वयाच्या 12 व्या वर्षी अचानक घरातून निघून गेलेला पोटचा गोळा घरी परतला अन् 90 वर्षांच्या आईंच्या आसवांचा बांध फुटला.एखाद्या चित्रपटाला लाजवेल,अशी ही सत्यकथा जत तालुक्यातील आंवढी येथील आहे.विठोबा व सुभाबाई कोडग या दांपत्याचा द्वितीय मुलगा बबन विठोबा कोडग हा अगदी चांगले कळत असताना वयाच्या 12 व्या वर्षी घरातून अचानक निघून गेला होता.त्यावेळी शोधाशोध करूनही तो मिळून न आल्याने कोडग कुंटुबियांना त्यांची प्रतिक्षा कायम होती.याच प्रतिक्षेत वडील विठोबा कोडग यांचा मुत्यू झाला. त्यानंतर बबन काल बुधवारी अचानक घरी परतला. दाढी वाढलेली वयही पन्नासी पार केलेला हा इसम जून्या आठवणी सांगत 90 वर्षीय वृध्द आईला तुझाच मुलगा असल्याचे सांगत तुला भेटायला आल्याचे सांगितले.

चाळीस वर्षानंतर आपला मुलगा  परतल्याने आईचे डोळे आनंदाश्रुने पाणावले. तिचे मातेचे हृदय दाटून आले.

वयाच्या बाराव्या वर्षी घरातून निघून गेलेले बबन यांनी काही दिवस गोवा येथे काढले.तेथून बेंळगाव येथे गेले.तेथे मिळेल ते काम करत असताना त्यांची ओळख शेख नामक इसमाबरोबर झाली. त्यांनी बबनचा संभाळ केला. लग्नही केले. बबनला आता दोन मुले आहेत.त्यांचा स्व:ताचा आयशर टेम्पो असून तो टेम्पो चालवित ते आपल्या कुंटुबियाचा उद्धरनिर्वाह करत आहेत. आईच्या भेटीनंतर बबन परत येतो म्हणून पुन्हा बेळगांवला रवाना झाले आहेत.

आंवढी ता.जत येथील बबन कोडग यांची चाळीस वर्षानंतर आईशी भेट झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.