दुध भेसळीतील बोके मोकाटचं | तालुकाभर बनावट दुधाचे कारखाने : अन्न भेसळच्या झोपेतील अधिकारी जागे होणार का ?

0

Rate Card

जत,प्रतिनिधी :दुधात भेसळ करुन कृत्रिम दूध तयार करुन भरमसाठ दराने विकणारे पांढर्‍या दुधातील काळे बोके आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत.जनतेच्या आरोग्याशी खेळत पांढर्‍या दुधाच्या नावावर काळा धंदा करणार्‍या गुन्हेगारांच्या टोळ्या उदयास आल्या आहेत. प्रशासनाचा वचक नसल्याने भेसळयुक्त विषारी दुधाचा धोका वाढू लागला आहे.

गेल्या वर्षभरात तालुक्यांत आरोग्याला हानिकारक भेसळयुक्त दुध तयार केले जात असतानाही अन्न भेसळच्या विभागाने एकही उघडकीस आणले नाही,हे विशेष.युरिया, दुधाची पावडर आणि अन्य रसायने मिसळून आरोग्यास घातक ठरणार्‍या दुधाचा धंदा बेलगामपणे सुरु आहे.हानिकारक दुधाचा थेट परिणाम माणसाच्या मेंदू आणि हृदयावर होत असतो.

काही वर्षांपूर्वी घडलेल्या हानिकारक दुधाच्या गोरखधंद्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दूध व्यवसायावर पाळत ठेवणे आवश्यक होते. सणासुदीच्या काळात सर्वांच्या तोंडाला स्वाद देणार्‍या मिठाईत भेसळ असते. आरोग्याला हानिकारक खवा आणि खाद्यतेलातून बनविल्या जाणार्‍या मिठाईची चव विषारी असल्याचे कुणालाही कळत नाही.ज्यांना याची माहिती असते ते अन्न भेसळ नियंत्रण मंडळ खास डब्यातून आलेल्या कागदी मिठाईत मश्गुल असते.

भेसळयुक्त  दूध आणि मिठाईमुळे जनतेचे आरोग्य धोक्याच्या मार्गावर असताना प्रशासन सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा देत असते.दुभत्या जनावरांना हानिकारक ठरणार्‍या बंदी असलेल्या औषधांची विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे.याच काळात हानिकारक औषधांमुळे हजारोंच्या आरोग्याचा धोका वाढला त्याची काळजी कोणालाच राहिली नाही.

केंद्र सरकारने काही औषधे जनावरांसाठी वापरण्यावर बंदी आणली आहे. मात्र,काहीजणांनी बंदी असलेल्या औषधांचा धंदाच चालविल्याची चर्चा आहे.जनावरांच्या आरोग्याला हानिकारक असलेल्या त्या औषधांच्या विक्रीतून अनेक जण मालामाल झाले तरी निष्पाप नागरिकांचे आरोग्य कंगाल झाले  आहे.

भेसळ शहरापासून खेड्यापर्यंत

सीलबंद प्लास्टिक पिशवीतील दूधही सुरक्षित राहिलेले नाही. दूध अधिक वेळ ताजे राहण्यासाठी त्यात सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रॉक्साईड मिसळले जाते. दूध पिशव्यातील भेसळ शहरापासून खेड्यांपर्यंत पोहोचली आहे. काही सोप्या चाचणीतून आपण दुधातील भेसळ ओळखू शकतो. नासलेल्या दुधाचा रंग निळा झाल्यास त्यामध्ये स्टार्च मिसळल्याचे समजावे. त्याचप्रमाणे दुधामध्ये लिटमस पेपर निळा झाल्यास त्या दुधात सोडा मिसळलेला समजावा.

जनावरांबरोबर माणसांवरही दुष्परिणाम

बंदी औषधांचे दुष्परिणाम जनावरांबरोबरच माणसांवरही होत असतात. ज्यादा दुधाच्या आशेने ती औषधे दुभत्या जनावरांना दिली जातात. मात्र, त्यामुळे जनावरांना कॅन्सरचा धोका असतो. तसेच अशा दुधाच्या सेवनामुळे  मुलांना कावीळ तसेच मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो. पुरुषांमधील रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. स्त्रियांना गर्भाशय आणि स्तनाचा रोग संभवतो. दुधाची घनता वाढविण्यासाठी त्यात युरिया, मालरोटेक्स, ग्लुकोज, मक्याचा स्ट्रार्च, साबुदाणे किंवा दुधाची भुकटी, लॅक्टो असे घटक मिसळले जातात. हे घटक वापरल्यामुळे दुधात दुप्पट पाणी मिसळूनही घनतेवर परिणाम होत नाही. स्निग्धांश वाढविण्यासाठी त्यात खाद्यतेलही वापरले जाते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.