जत | खड्डे मुजविताना दर्जा नाही
जत : तालुक्यातील काही रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे.मात्र हे दर्जाहीन काम सुरू असल्याचे आरोप होत आहेत. खड्ड्यात मातीवर डांबर टाकून त्यातच मोठी खड्डी टाकण्यात येत आहे. त्यावर क्रश टाकून मुलामा लावण्याचे प्रकार सुरू आहेत.खड्ड्यात टाकलेले दगड रोलिंग अथवा नियम सोडून काम केल्यामुळे तासाभरात वाहनाच्या दाबाने उखडत आहेत.टाकलेले दगड रस्त्यावर विकरून पुन्हा खड्डे जैसे थे होत आहेत.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

जतेत असे खड्डे भरले जात आहेत.