शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा,म्हणून बनाळी ते पंढरपूर पदयात्रा | संजीवकुमार सांवत सहपत्नी आज बनाळीतून निघणार
जत,प्रतिनिधी : राज्यात शिवसेनाचा मुख्यमंत्री व्हावा व शिवसेनेचे सरकार पाच वर्षे टिकावे यासाठी जतचे शिवसेना नेते माजी सभापती संजीवकुमार सांवत व त्यांच्या पत्नी रूपाली सांवत हे विनाचप्पल,निरकांर बनाळी ते पंढरपूर पदयात्रा काढून विठ्ठलाला साकडे घालणार आहेत.राज्यात भाजपने बहुमत नसल्याने सरकार स्थापनेस नकार दिला आहे. त्यामुळे राज्यपालांनी सरकार स्थापनेचे शिवसेना निमंत्रण दिले आहे.राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या बरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.हे सरकार व्हावे ही श्रीची इच्छा असल्याने सर्व प्रकारे परिस्थिती अनुकूल झाली आहे.त्यामुळे शिवसेनेचे हे सरकार पाच वर्षे टिकावे,सरकारला ताकत द्यावी, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठ्ठलचरणी सांवत दांपत्य करणार आहेत.सांवत दांपत्य आज सकाळी बनाळीचे ग्रामदैवत श्री.बनशंकरी देवीचे दर्शन घेऊन रवाना होणार आहेत.त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्तेही पदयात्रेत सामील होणार आहेत.सांवत यांनी यापुर्वीही म्हैसाळच्या पाण्यासाठी पदयात्रा काढली होती.आता शिवसेनेचे सरकार यावे म्हणून ते काढत असलेल्या पदयात्रेमुळे ते चर्चेत आले आहेत.
