गुड्डापूरच्या दानम्मादेवी यात्रा 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान

0

Rate Card

माडग्याळ,वार्ताहर : गुडडापूर ता.जत येथील श्री.दानम्मा देवीची कार्तिक यात्रा सालाबादप्रमाणे सोमवार दि.25 नोव्हेंबर ते बुधवार दि.27 नोव्हेंबर अशी तीन दिवस भरणार असल्याची माहीती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश गणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या पत्रकार परिषदेला देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चंद्रशेखर गोब्बी,सदाशिव गुडोडगी,भिमणणा पुजारी,संतोष पुजारी, सचिव विठ्ठल पुजारी उपस्थित होते. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दि.26 नोव्हेंबर अमावस्ये दिवशी आहे. याच दिवशी सायंकाळी कार्तिक दिपोउत्सव व रथोउत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजयकाका पाटील व आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहेत. विविध प्रकारच्या व्यवसायाकांनी आपआपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या जागेसाठी देवस्थान ट्रस्टशी आगावू संपर्क साधावा त्यांना माफक दरात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऐन वेळी यात्रेत येणार्‍यांना जागा मिळणार नाही. यात्रा स्थळी वाहनांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी आपली वाहने पार्किंग मध्येच लावावेत जेणे करून रहदारीचा त्रस भाविकांना होणार नाही.पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते.त्यामुळे त्यांना राहण्याची स्वतंत्र व्यवस्था देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात आली आहे. स्वतंत्र अन्न दासोह प्रसादाची व्यवस्था सोरडी रस्त्याच्या कडेला आसणाऱ्या कर्नाटक भवन मध्ये करण्यात येणार आहे. चालु वर्षी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गुड्डापूरला जोडणारे चारी बाजुचे रस्ते यतनाळ कर्नाटक बॉर्डर ते तिंकुडी ता.जत व कोटलगी कर्नाटक बॉर्डर ते व्हाया मुचंडी,सोरडी ता. जत व सिदनाथ दरिबडची व्हाया गुड्डापूर असणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ते मुजवणे गरजेचे आहे.त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून लेखी निवेदन दिले आहे.मात्र अद्याप पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्यात आली नाही.तरी लोक प्रतिनिधींनी यात लक्ष घालून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता दुरुस्त करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास भाग पाडावे.यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र व कर्नाटक परिवहन मंडळाकडून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.