सामाजिक न्याय भवनपर्यंत सिटी बस सोडा : सुशीला होनमोरे

0

सामाजिक न्याय भवन सांगली साठी इमेज परिणाम

Rate Card

सोन्याळ,वार्ताहर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड घाटगे हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या विशेष समाजकल्याण ऑफिसला जाणे-येण्यासाठी सांगली स्टँडपासून सिटी बस सोडण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला होनमोरे यांनी आगार व्यवस्थापक आणि आगार प्रमुख सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सांगली स्टँडपासून सामाजिक न्याय भवनचे अंतर  साधारणपणे अडीच किलोमीटर आहे.या कार्यालयातून जातपडताळणीचे महत्वाचे कामकाज चालते.शिवाय मागासवर्गीय समाजातील लोकांच्या उन्नतीसाठी विविध महामंडळाची कार्यालये येथे आहेत.दररोज हजारो लोकांची वर्दळ या ठिकाणी बघायला मिळते.  मध्यवर्ती बसस्थानाकापासून त्या ठिकाणी लोकांना जाणे-येण्यासाठी एसटी किंवा शहर वाहतुकीची बससेवा उपलब्ध नाही. सांगली स्टँडपासून रिक्षाने किंवा अन्य खाजगी गाडीने जावे लागते.रिक्षाने जाण्यासाठी 70 ते 100 रुपये घेतले जातात. ही रक्कम  जास्त  आणि अवाजवी आहे.दररोज जातपडताळणी ऑफिसमध्ये  जातीचा दाखला पडताळणी प्रस्ताव सादर करणे आणि इतर चौकशीकामी दररोज शेकडो लोकांची रीघ लागलेली असते.नेमका याचा गैरफायदा रिक्षाचालक घेताना दिसतात.

रिक्षा चालकांच्या मुजोरीने आता टोक गाठले असून सांगली शहरातील वेगवेगळ्या भागातुन वाटेल त्या पद्धतीने भाडेदरांची आकारणी सुरू असल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.